पत्नीला इंस्टाग्रामचं वेड! कधी पेट्रोल अन् चाकू घेऊन आत्महत्येचा प्रयत्न तर कधी दुसऱ्याच पुरुषासोबत.... नेमकं प्रकरण काय?

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये पत्नीला इन्स्टाग्रामचं व्यसन असल्यामुळे वैतागलेल्या एका तरुणाने पोलिस आयुक्तांकडे संपर्क साधला. येथे त्याने पोलिसांकडे आपला जीव वाचवण्याची विनंती केली.

पत्नीला इंस्टाग्रामचं वेड! कधी दुसऱ्याच पुरुषासोबत.... नेमकं प्रकरण काय?
पत्नीला इंस्टाग्रामचं वेड! कधी दुसऱ्याच पुरुषासोबत.... नेमकं प्रकरण काय?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

इंस्टाग्रामवर व्हिडीओ बनवण्याच्या नादात भलताच प्रकार

point

पतीला दिली जीवे मारण्याची धमकी...

Crime News: दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये पत्नीला इंस्टाग्रामचं व्यसन असल्यामुळे वैतागलेल्या एका तरुणाने पोलिस आयुक्तांकडे संपर्क साधला. येथे त्याने पोलिसांकडे आपला जीव वाचवण्याची विनंती केली. प्रकरणातील पीडित पतीचा आरोप आहे की त्याच्या पत्नीला इंस्टाग्रामवर रील बनवण्याचं इतकं वेड आहे की ती इंस्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ बनवते आणि विरोध केल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी देते.

पोलीस आयुक्तांना दाखवले व्हिडीओ... 

संबंधित तरुणाने पोलीस आयुक्तांसमोर रडत रडत आपला जीव वाचवण्याची विनंती केली. पीडित पतीने पोलीस आयुक्तांना काही व्हिडिओ सुद्धा दाखवले. या व्हिडिओंमध्ये, पत्नी कधी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताना दिसली, तर कधी ती पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याची धमकी देताना दिसत होती. एका व्हिडिओमध्ये ती तिच्या पतीच्या मागे चाकू घेऊन धावतानाही दिसत होती.

हे ही वाचा: Govt Job: ‘इंजिनीयरिंग’चं शिक्षण घेतलंय? अन् सरकारी नोकरीच्या प्रयत्नात आहात? मग ‘या’ भरतीची सुवर्णसंधी सोडू नका...

जीवे मारण्याची धमकी... 

पतीने सांगितलं की त्याचे 2009 मध्ये लग्न झालं. लग्नानंतरची 15 वर्षे सर्व काही ठीक होतं. त्याला 9 आणि 6 वर्षांची दोन मुलं देखील आहेत. पण 2024 मध्ये पत्नीला इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करण्याची आवड निर्माण झाली. यानंतर कालांतराने तिला व्हिडीओ काढून ते इंस्टाग्रामवर अपलोड करण्याचं वेड लागलं. पतीच्या मते, जर पत्नीला तिच्याविरोधात काही सांगितलं तर ती गोंधळ घालते. अनेकदा ती वाद घालते आणि त्यावेळी मारहाण देखील करते. यापूर्वी तिने बऱ्याचदा जीवे मारण्याची देखील धमकी दिली होती.

हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मुंबई ते रत्नागिरी पर्यंतचा प्रवास केवळ 5 तास... ‘ही’ सेवा पुढच्या महिन्यातच होणार सुरू!

पतीचा आरोप आहे की त्याची पत्नी इतर पुरुषांसोबत असते आणि रील बनवताना अश्लील वर्तन करते. तिला याबाबतीत विरोध केल्यास ती त्याला धमकी देते. इंस्टाग्रामवर रील अपलोड करण्याच्या या वेडापायी पत्नी इतकी आंधळी झाली की ती लोकप्रियता मिळविण्यासाठी स्वतःचं नुकसान करण्यास मागेपुढे पाहत नाही. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp