गणेश चतुर्थीला चंद्र दर्शन का करू नये? चुकून चंद्र पाहिलाच, तर घडतं भयंकर..जाणून घ्या रंजक कहाणी
Ganesh Chaturthi 2025: आज देशभरात गणेश चतुर्थीचं महापर्व धूमधडाक्यात साजरं केलं जात आहे. गणेश चतुर्थीला श्री गणेशाचं पूजन करण्यास विशेष महत्त्व दिलं जातं.

बातम्या हायलाइट

गणेश चतुर्थीला चंद्र का पाहू नये?

शाप दिल्याने चंद्राची गेली चमक

गणेश चतुर्थीला केव्हा दिसणार चंद्र?
Ganesh Chaturthi 2025: आज देशभरात गणेश चतुर्थीचं महापर्व धूमधडाक्यात साजरं केलं जात आहे. गणेश चतुर्थीला श्री गणेशाचं पूजन करण्यास विशेष महत्त्व दिलं जातं. पण यादिवशी चंद्र दर्शन अशुभ मानलं जातं. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात चतुर्थी तिथीला चंद्राचं दर्शन अशुभ असतं, असं म्हणतात. या दिवशी चंद्र दर्शन केल्यानं व्यक्तीवर खोटे आरोप लागू शकतात. माणसाचं चारित्र्यहनन होऊ शकतं. यामागे एका पौराणिक कथेचाही हवाला दिला जातो.
पौराणिक कथेनुसार, एक दिवस श्री गणेश त्यांच्या आवडीच्या मिठाईचा आनंद घेत होते. तेव्हा तिथून प्रस्थान करणाऱ्या चंद्र देवाने श्री गणेशाला पाहिलं आणि त्यांची खिल्ली उडवली. चंद्र देवाने त्यांचं सौंदर्य आणि रुपाच्या अहंकारामुळे असं केलं होतं. त्यानंतर श्री गणेशाने चंद्रदेवाला शाप दिलं की, त्यांचं रुप आणि चमक नष्ट होईल. जो कोणी व्यक्ती त्यांना पाहिल, त्याला सुद्धा कलंक लागेल.
शाप दिल्याने चंद्राची गेली चमक
शाप दिल्यानंतर चंद्राचे सर्व रुपाची चमक संपू लागली. तेव्हा चंद्राला त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी श्री गणेशाची माफी मागितली आणि प्रार्थना केली. तेव्हा त्यांची भक्ती आणि क्षमा पाहून श्री गणेश त्यांना प्रसन्न झाले. त्यानंतर ते म्हणाले, हा शाप पूर्णपणे मागे घेऊ शकत नाही. पण यावर नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं.
हे ही वाचा >> मनोज जरांगेंची तोफ आझाद मैदानातच धडाडणार! परवानगी मिळाली, पण मुंबई पोलिसांनी दिला दम, नियम मोडले तर..
श्री गणेशजीने हे शाप मागे घेत म्हटलं की, भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशीच चंद्राचं दर्शन केल्यावर कंलकीत होऊ शकता. त्यादिवसापासून भाद्रपत शुल्क चतुर्थीला चंद्र पाहणे अशुभ मानलं जातं. या दिवसाला कलंक चौथ असंही म्हटलं जातं. पौराणिक मान्यतेनुसार, विनायक चतुर्थीच्या दिवशी चुकूनही चंद्रदर्शन झालं, तर व्यक्तीला श्रीमद्भागवत मध्ये वर्णित श्री कृष्ण देवाची स्यमंतक मणी कथेचं पठण केलं पाहिजे. ही कथा ऐकल्यावर किंवा सांगितल्यावर चंद्र दर्शनाने होणारा कलंक समाप्त होऊ शकतो. याशिवाय काही लोक या दिवशी श्री गणेश मंत्राचं जप करतात.
गणेश चतुर्थीला केव्हा दिसणार चंद्र?
गणेश चतुर्थीला आज चंद्रास्तची वेळ रात्री 8 वाजून 55 मिनिटांपर्यंत बोलला जात आहे. ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार, 27 ऑगस्टच्या रात्री संध्याकाळी किंवा रात्री निघणाऱ्या लोकांनी चंद्राच्या दर्शनापासून वाचलं पाहिजे.