बारावीत शिकणाऱ्या पुतण्याने चुलतीच्या डोक्यात गोळी घातली अन् थेट पोलिस स्टेशन गाठले, कारण ऐकून पोलिसही हादरले

मुंबई तक

Crime News : कौटुंबिक वादातून एका बारावीत शिकणाऱ्या पुतण्याने आपल्या सख्ख्या चुलतीची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर आरोपी पुतण्या स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाला आज (5 मार्च) सकाळी घडलेल्या या हत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्येमागं कौटुंबिक वादाचं कारण असल्याचं पोलिस तसापात निष्पन्न झालं आहे. पुतण्याने चुलतीची हत्या नेमकी का केली आणि त्यांच्यात कोणता वाद होता, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बारावीत शिकणाऱ्या पुतण्याने चुलतीच्या डोक्यात गोळी घातली अन् थेट पोलिस स्टेशन गाठले

point

कारण ऐकून पोलिसही हादरले

Crime News : कौटुंबिक वादातून एका बारावीत शिकणाऱ्या पुतण्याने आपल्या सख्ख्या चुलतीची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर आरोपी पुतण्या स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाला आज (5 मार्च) सकाळी घडलेल्या या हत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्येमागं कौटुंबिक वादाचं कारण असल्याचं पोलिस तसापात निष्पन्न झालं आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील ही घटना आहे. पुतण्याने चुलतीची हत्या नेमकी का केली आणि त्यांच्यात कोणता वाद होता, जाणून घेऊया.
 
हे ही वाचा : प्रेयसीने आपल्या साथीदारांच्या मदतीने प्रियकरावर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, रुग्णालयात मृत्यू

डोक्यात गोळी घालून हत्या

पूजा त्यागी असं ३२ वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. सकाळी 9:30 च्या सुमारास ती आपल्या खोलीत काहीतरी काम करत बसल्या होत्या. याचवेळी बारावीत शिकणारा तिचा 17 वर्षाचा पुतण्या शिवा अचानक खोलीत शिरला आणि त्याने पूजाच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी लागताच पूजा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून पूजाचा नवरा धर्मेंद्र त्यागी धावत खोलीत आला, तेव्हा आरोपी शिवा हातात शस्त्र घेऊन पळताना दिसला. पूजाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. यानंतर शिवा स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाला.

आठ महिन्यांपूर्वी आईचा मृत्यू

यानंतर आरोपी शिवाने पोलीस चौकशीत धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, 'काकीसोबत त्याचे नेहमी खटके उडत असत. सुमारे आठ महिन्यांपूर्वी त्याच्या आईचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे तो मानसिक तणावात होता. याच रागातून मी हे पाऊल उचलले.' आरोपीकडून पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले बेकायदेशीर शस्त्र आणि काडतूस जप्त केले आहे. आरोपीचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत असून, दोन दिवसांपूर्वीच ते सुटी संपवून कर्तव्यावर परतले होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

हे ही वाचा : ऑनलाईन गेमिंगच्या नादात स्वत:चं आख्खं कुटुंब संपवलं, कोल्ड्रिंकमध्ये विष मिसळून कुटुंबासह प्यायला; हादरवून टाकणारं प्रकरण

हे वाचलं का?

    follow whatsapp