प्रेयसीने आपल्या साथीदारांच्या मदतीने प्रियकरावर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, रुग्णालयात मृत्यू

मुंबई तक

crime news : देशभरात मोठ्या प्रमाणात अवैध प्रेमसंबंधांच्या घटना घडू लागलेल्या आहेत. अशीच अवैध प्रेमसंबंधाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसी आणि तिच्या साथिदारांनी मिळून आपल्या प्रियकरावर पेट्रोल ओतून जाळलं.  त्यानंतर पाच दिवसानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान आरोपीची हत्या झाली. या घटनेनंतर आरोपी फरार झाले.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चांदवर पेट्रोल ओतून जाळलं

point

चांद 80 % भाजून निघाला

crime news : देशभरात मोठ्या प्रमाणात अवैध प्रेमसंबंधांच्या घटना घडू लागलेल्या आहेत. अशीच अवैध प्रेमसंबंधाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसी आणि तिच्या साथिदारांनी मिळून आपल्या प्रियकरावर पेट्रोल ओतून जाळलं.  त्यानंतर पाच दिवसानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान आरोपीची हत्या झाली. या घटनेनंतर आरोपी फरार झाले. ही घटना उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील आहे.   

हे ही वाचा : 6 महिन्यांपूर्वी प्रियकरासोबत पळून गेलेली तरुणी घरी परतली; पण मध्यरात्री झाडाखाली आढळले दोघांचे मृतदेह...

चांदवर पेट्रोल ओतून जाळलं

संबंधित घटना 27 फेब्रुवारी रोजी शाहगंज पोलीस ठाणे परिसरात घडल्याचे वृत्त आहे. दरम्यान, त्याची प्रेयसी शबनम तिची आई भाऊ आणि दुसऱ्या एका मित्रासोबत आझमपाडा रोडवर आली आणि तिने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. दोघांमधील वादानंतर तिने चांदला रिक्षातून बाहेर काढले, त्याच्यावर पेट्रोल ओतून जाळून टाकले, असा आरोप करण्यात आला आहे. 

चांद 80 % भाजून निघाला

या हल्ल्यात चांद हा 80 % भाजून निघाला होता, जवळच्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सुरुवातीला चांदला एका रुग्णालयात दाखल केले, त्यानंतर त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले होते. आयसीयु विभागात पाच दिवस उपचार घेतल्यानंतर, बुधवारी रात्री उशिरा चांदचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. 

मृत चांदचा भाऊ साबीरने आरोप केला की, पोलिसांनी सुरुवातीला आरोपी शबनम आणि नगीनला अटक केली, परंतु त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. ते मोकळे फिरतात आणि कुटुंबाला धमकावत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp