निलेश घायवळला कानशि‍लात लगावणाऱ्या कुख्यात गुंडावर गोळीबार, सागर मोहळकरवर सात राऊंड फायर

मुंबई तक

Ahilyanagar Crime News : जामखेड शहरातील न्युरानी कॉलनी येथे सात-साडेसात वाजण्याच्या सुमारास कुख्यात गुंड सागर मोहळकर वर मोटारसायकलवरुन आलेल्या एकाने गोळीबार करत सात राऊंड फायर केले. यातील चार गोळ्या अंगात असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. यात मोहळकर गंभीर जखमी झाला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

ADVERTISEMENT

Ahilyanagar Crime News
Ahilyanagar Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

निलेश घायवळला कानशि‍लात लगावणाऱ्या कुख्यात गुंडावर गोळीबार

point

सागर मोहळकरवर सात राऊंड फायर

अहिल्यानगर, रोहित वाळके : जामखेड शहरातील न्युरानी कॉलनी येथे सात-साडेसात वाजण्याच्या सुमारास कुख्यात गुंड सागर मोहळकर वर मोटारसायकलवरुन आलेल्या एकाने गोळीबार करत सात राऊंड फायर केले. यातील चार गोळ्या अंगात असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. यात मोहळकर गंभीर जखमी झाला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. निलेश घायवळ याला कानशिलात लगावल्याने मोहळकर चर्चेत आला होता.

हे ही वाचा : मुलीला भेटण्याच्या बहाण्याने निर्जन शेतात बोलावले, नंतर प्रियकरासह मित्रांनी आळीपाळीने... प्रियकरात जागा झाला राक्षस

नेमकं काय घडलं?

जामखेड शहरातील न्युरानी कॉलनी येथे बुधवार दि. 4 रोजी सायंकाळी सात-साडेसात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. कुख्यात गुंड सागर मोहळकर हा नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आलेला होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी वडिलांनी त्याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशन एनसी दाखल केली होती. तो नशेच्या आहारी असायचा. जामखेड परिसरात त्याची मोठी दहशत होती. 

अंगात चार गोळ्या

गोळीबाराच्या घटनेनंतर जामखेड पोलीसांनी ताबडतोब त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नंतर शहरातील खाजगी दवाखान्यात दाखल केले व नंतर पुढील उपचारासाठी नगरला हलवले. त्याच्या अंगात चार गोळ्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले यामुळे एकुण सात राउंड फायर झाले असावेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp