रंग लावण्याच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग, नंतर घरात घुसून केली मारहाण
Crime News : धुलिवंदन सणादिवशी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रंग लावण्याच्या बहाण्याने एका मुलीचा विनयभंग केला आणि तिच्या घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आरोपीचे तरुणीच्या कुटुंबाशी गैरवर्तन
महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटनेत वाढ
Crime News : धुलिवंदन सणादिवशी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रंग लावण्याच्या बहाण्याने एका मुलीचा विनयभंग केला आणि तिच्या घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना उत्तराखंडच्या देहारादून राजधानीतील नेहरू कॉलनी परिसरातील राजीव नगरमध्ये घडली. या घटनेनं संबंधित परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा : प्रेयसीने आपल्या साथीदारांच्या मदतीने प्रियकरावर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, रुग्णालयात मृत्यू
आरोपीचे तरुणीच्या कुटुंबाशी गैरवर्तन
या संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेले आहेत, ज्यात आरोपी तरुणीच्या कुटुंबाशी गैरवर्तन करत असल्याचे दिसून येत आहे. तसेत अनेकदा मारहाण देखील केली. या घटनेने परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. संबंधित प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली, तसेच या प्रकरणाची दखल घेत कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटनेत वाढ
महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटनेत मोठा वाढ होऊ लागला आहे. यामुळे आता महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. धुलिवंदनासारख्या सणादिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्याने परिसर हादरून गेला आहे. या घटनेनं सणाला गालबोट लागलं. आनंदाच्या वातावरण थेट दुःखात बदललं.










