रायगड आणि रत्नागिरीत जोरदार पावसाची शक्यता, तर 'या' ठिकाणी येलो अलर्ट
Maharashtra Weather : 28 ऑगस्ट रोजी हवामान विभागाने पालघर आणि कोकण पट्ट्यातील काही भागांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या सरींसह वातावरण ढगाळ राहील असा अंदाज वर्तवला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

28 ऑगस्ट रोजी हवामान विभागाचा अंदाज

'या' भागात हलक्या सरींसह वातावरण ढगाळ

जाणून घ्या पावसाची एकूण परिस्थिती
Maharashtra Weather : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला होता. सध्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची चांगली स्थिती पाहायला मिळतेय. तर मुंबईमध्ये एका आठवड्यापूर्वी पावसाने रेड अलर्ट जारी केला होता. अशातच आता 28 ऑगस्ट रोजी हवामान विभागाने पालघर आणि कोकण पट्ट्यातील काही भागांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या सरींसह वातावरण ढगाळ राहील असा अंदाज वर्तवला आहे.
हे ही वाचा : मनोज जरांगेंना बाप्पा पावले, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आझाद मैदानावर जरांगे तळ ठोकणार
कोकण विभाग :
कोकण भागातील विशेषतः ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीत हवामान विभागाने मध्यम ते जोरदार पावसाची शक्यतेचा अंदाज वर्तवला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार 40-50 किमी/तास वेगाने वारे वाहण्याची हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र :