गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था! 17,000 हून अधिक पोलीस तैनात...

मुंबई पोलिसांनी सोमवारी (25 ऑगस्ट) गणेशोत्सव 2025 साठी व्यापक सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापन योजना जाहीर केल्या आहेत तसेच, 10 दिवसांच्या या उत्सवादरम्यान शहरात 17,000 हून अधिक पोलीस तैनात केले जातील, असं सांगण्यात आलं आहे.

17,000 हून अधिक पोलीस तैनात...
17,000 हून अधिक पोलीस तैनात...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था

point

मुंबई पोलिसांनी केलं आवाहन...

Mumbai Ganeshotsav 2025: मुंबई पोलिसांनी सोमवारी (25 ऑगस्ट) गणेशोत्सव 2025 साठी व्यापक सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापन योजना जाहीर केल्या आहेत तसेच, 10 दिवसांच्या या उत्सवादरम्यान शहरात 17,000 हून अधिक पोलीस तैनात केले जातील, असं सांगण्यात आलं आहे. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या 10 दिवसांच्या कालावधीत संपूर्ण भारतभर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

‘इतके’ पोलीस अधिकारी तैनात... 

दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही शहरातील सांस्कृतिक सादरीकरणे आणि सामाजिक कार्यक्रमांनी सजलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं. हा उत्सव शांततेत आणि सुरक्षितपणे साजरा करण्यासाठी, मुंबई पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण शहरात कडक सुरक्षा दल तैनात करण्याची योजना आखण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यवस्थेअंतर्गत, गणेशोत्सवाच्या कालावधीत 36 पोलीस उपायुक्त (डीसीपी), 51 सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी), 2,637 पोलीस अधिकारी, 14,430 पोलीस कॉन्स्टेबल ऑन ड्यूटी असतील.

प्रमुख मार्गांवर पथके तैनात 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, याव्यतिरिक्त, अतिरिक्त मदतीमध्ये आरपीएफ प्लाटून (रेल्वे संरक्षण दल), एसआरपीएफ (राज्य राखीव पोलिस दल), जलद प्रतिक्रिया पथके, दंगल नियंत्रण पथके, डेल्टा, लढाऊ युनिट्स, बॉम्ब शोधक तसेच निकामी पथके आणि गृहरक्षक दल यांचा समावेश असेल. गिरगाव चौपाटी, दादर, जुहू, मार्वे, वर्सोवा आणि पवई तलाव यासारख्या प्रमुख विसर्जन स्थळांवर तसेच मिरवणुकीमुळे जास्त वाहतूक असण्याची शक्यता असलेल्या प्रमुख मार्गांवर ही पथके तैनात केले जातील.

हे ही वाचा: 5 मुलांची आई अचानक घरातून गायब... 7 दिवसांनंतर पतीला समजली ‘ती’ गोष्ट! नंतर थेट पोलिसांत...

शनिवारी मुंबई पोलिसांनी जाहीर केलेल्या वाहतूक अधिसूचनेत म्हटले आहे की, 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत शहरात मोठ्या संख्येने लोक गणेशोत्सव 2025 साजरा करणार आहेत आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्था करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) जुन्या आणि धोकादायक रोड ओव्हरब्रिज (आरओबी) बाबत मार्गदर्शक तत्त्वे आणि आवाहन जाहीर केलं आहे. त्यानुसार, खालील व्यवस्था कायम राहतील असा निर्णय घेण्यात आला आहे.

1. कोणत्याही वेळी 100 पेक्षा जास्त लोकांनी आरओबी ओलांडू नये.

2. आरओबीवर मिरवणुका थांबवल्या जाणार नाहीत.

3. आरओबीवर कोणतंच नृत्य किंवा लाऊडस्पीकर वाजवता येणार नाहीत.

हे ही वाचा: गणपती मंडपात मृत्यूचा तांडव... चाकूने वार करून तरुणाची हत्या! नेमकं काय घडलं?

मुंबई पोलिसांनी सर्व नागरिकांना, विशेषतः गर्दीच्या ठिकाणी, अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आणि कोणत्याही बेवारस किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरित तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना सर्व सुरक्षितता तसेच गणेशोत्सवातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास आणि गणेशोत्सव आनंदाने, शिस्तीने, नागरी जबाबदारीने साजरा करण्यास प्रोत्साहित केलं जातं. एका अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, लोक तात्काळ मदतीसाठी पोलीस हेल्पलाइन 100 किंवा 112 वर संपर्क साधू शकतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp