निलेश घायवळला कानशि‍लात लगावणाऱ्या गुंडावर गोळीबार, आता रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांना टॅग करत पोस्ट

मुंबई तक

Rohit Pawar Facebook post : सागर मोहळकर हा जामखेड परिसरातील एक कुख्यात गुंड असून त्याच्यावर 307 (जीवे मारण्याचा प्रयत्न) सारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो काही दिवसांपूर्वीच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. तो नशेच्या आहारी गेला असल्याने परिसरात त्याची मोठी दहशत होती.

ADVERTISEMENT

Rohit Pawar Facebook post
Rohit Pawar Facebook post
social share
google news

बातम्या हायलाइट

point

निलेश घायवळला कानशि‍लात लगावणाऱ्या गुंडावर गोळीबार

point

आता रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांना टॅग करत पोस्ट

Rohit Pawar on Sagar Mohalkar Firing case : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात बुधवारी सायंकाळी गोळीबाराच्या एका थरारक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील न्युरानी कॉलनी परिसरात कुख्यात गुंड सागर मोहळकर याच्यावर अज्ञाताने अंदाधुंद गोळीबार केला. सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास मोहळकर या परिसरात असताना मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोराने त्याच्यावर एकूण सात राऊंड फायर केले. या हल्ल्यात सागर मोहळकर गंभीर जखमी झाला असून त्याच्या शरीरात चार गोळ्या घुसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमीला रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नगरला हलवण्यात आले आहे.

सागर मोहळकर हा जामखेड परिसरातील एक कुख्यात गुंड असून त्याच्यावर 307 (जीवे मारण्याचा प्रयत्न) सारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो काही दिवसांपूर्वीच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. तो नशेच्या आहारी गेला असल्याने परिसरात त्याची मोठी दहशत होती. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांनी त्याच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात एनसी (NC) दाखल केली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर काही दिवसांतच त्याच्यावर असा जीवघेणा हल्ला झाल्याने यामागे जुना वाद किंवा टोळीयुद्ध असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : मुंबई-अहमदाबाद हायवेवर बर्निंग ट्रकचा थरार, ड्रायव्हरचा केबिनमध्येच होरपळून मृत्यू; व्हिडिओ

या घटनेनंतर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "माझ्या मतदारसंघात जामखेडमध्ये गेल्या काही काळापासून गुन्हेगारी वेगाने फोफावत असून गुन्हेगारांकडून गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळं सामान्य माणसांमध्ये दहशतीचं वातावरण असून यासंदर्भात अनेकदा आवाज उठवला तरी या घटनांना आळा घालण्यास पोलीस प्रशासनाला यश आलेलं नाही. आजही सागर मोहोळकर या तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या असून तो गंभीर जखमी आहे. पोलीस प्रशासनाने हे गुन्हेगार आणि त्यांच्या टोळ्यांच्या मुसक्या आवळून त्यांचा समूळ नायनाट करावा आणि सामान्य माणसासाठी दहशतमुक्त वातावरण निर्माण करावं. तसंच सरकारनेही या गोष्टीकडं गांभीर्याने लक्ष द्यावं, ही विनंती!"

हे वाचलं का?

    follow whatsapp