मराठा आंदोलकांवर दु:खांचं सावट! जरांगेंच्या कट्टर समर्थकाचा मृत्यू, 'त्या' ठिकाणी घडलं तरी काय?

satish deshmukh dies : आंदोलनात सामिल झालेल्या एका आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. निधन झालेल्या आंदोलकाचे नाव सतीश ज्ञानोबा देशमुख (वय 45) असे  नाव आहे. ते बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वारपगंजचे रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे.

maratha protester satish deshmukh dies of massive heart attack
maratha protester satish deshmukh dies of massive heart attack
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन

point

मनोज जरांगेंनी वाहिली आदरांजली

Satish deshmukh dies : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. मात्र, या आंदोलनात सामिल झालेल्या एका आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. निधन झालेल्या आंदोलकाचे नाव सतीश ज्ञानोबा देशमुख (वय 45) असे  नाव आहे. ते बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वारपगंजचे रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं मराठा बांधवांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. 

हे ही वाचा : आधी तरुणीला बंदी बनवलं, नंतर सहा महिने आळीपाळीने केलं लैंगिक शोषण, प्रकरण आईला समजताच...

मुंबईकडे जाताना तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सतीश देशमुख यांना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं. त्यांच्या पाश्चात पत्नी संध्या, प्रसाद आणि वृद्ध आई पुष्पा बाई असं त्यांचं एकूण कुटुंब आहे. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाला आंदरांजली वाहिली आहे. मुंबईकडे लाखो मराठा बांधवांनी कूच केली. याचदरम्यान, आंदोलक सतीश यांचं निधन झालं. ते नेहमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सामिल असाचे. 

मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक

सतीश हे मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक होते. ते प्रत्येक आंदोलनात सामिल झाले होते. मुंबईच्या मोर्चात त्यांनी सहभाग घेतला होता. मात्र, जुन्नर येथे त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. या घटनेनं मराठा आंदोलकांच्या डोळ्यात अश्रू आहेत. 

हे ही वाचा : बीड जिल्ह्यात टोळक्यांनी आईसह लेकीवर लोखंडी पाईप अन् रॉडनं केला हल्ला, जनावरासारखं काळं निळं होईपर्यंत मारलं

मुंबई उच्च न्यायालयाचा उपोषणासाठी हिरवा कंदील 

दरम्यान, पुन्हा एकदा मराठा बांधव आरक्षणासाठी पेटून उठला आहे. मनोज जरांगेंनी गणरायाचं दर्शन घेतलं आणि मुंबईकडे कूच केली आहे. अशातच आता मुंबई उच्च न्यायालयाने देखील मनोज जरांगेंना उपोषणासाठी हिरवा कंदील दर्शवला आहे. यामुळे मराठा बांधवांच्यात आनंदाचं वातावरण होतं. पण, सतीश यांच्या जाण्यानं एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp