गणेश चतुर्थी 2025: केवळ भारतातच नव्हे तर ‘या’ 4 देशांत सुद्धा धुमधडाक्यात साजरा होतो गणेशोत्सव!

गणेश चतुर्थीचा सण केवळ भारतातच नाही तर इतर अनेक देशांमध्ये सुद्धा साजरा केला जातो. भारताव्यतिरिक्त, असे अनेक देश आहेत जिथे गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ‘या’ देशांबद्दल जाणून घेऊया.

‘या’ 4 देशांत सुद्धा धुमधडाक्यात साजरा होतो गणेशोत्सव!
‘या’ 4 देशांत सुद्धा धुमधडाक्यात साजरा होतो गणेशोत्सव!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारताव्यतिरिक्त, या’ 4 देशांत सुद्धा साजरा होतो गणेशोत्सव!

point

'या' देशांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थी हा सण देशभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दहा दिवस साजरा होणारा हा सण भारतातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की गणेश चतुर्थीचा सण केवळ भारतातच नाही तर इतर अनेक देशांमध्ये सुद्धा साजरा केला जातो. भारताव्यतिरिक्त, असे अनेक देश आहेत जिथे गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ‘या’ देशांबद्दल जाणून घेऊया.

नेपाळ 

भारताचा शेजारी देश नेपाळमधील संस्कृती आणि बरेच सण भारतासारखेच आहेत. या देशात सुद्धा गणेश चतुर्थी 'विनायक चतुर्थी' म्हणून साजरी केली जाते. येथे भगवान गणेशाला विघ्नांचा नाश करणारा तसेच शुभ आणि लाभाचे प्रतीक मानले जाते. नेपाळमध्ये हा सण अतिशय धार्मिक पद्धतीने साजरा केला जातो. भाविक मंदिरांमध्ये जातात आणि प्रार्थना करतात, विशेषतः काठमांडूमधील गणेश मंदिर आणि चांगू नारायण मंदिरात मोठ्या संख्येने भाविक जमतात.

मॉरिशस 

आफ्रिकन खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेल्या मॉरिशसला बहुतेकदा 'लिटल इंडिया' म्हटले जाते कारण त्यातील बहुतेक लोकसंख्या भारतीय वंशाची आहे. येथे गणेश चतुर्थी हा एक मोठा सामुदायिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. भारताप्रमाणेच, येथेही भव्य सार्वजनिक मंडप उभारले जातात आणि प्रचंड तसेच कलात्मक गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते. या दहा दिवसांच्या उत्सवादरम्यान, भक्तीगीते गायली जातात, प्रार्थना केली जाते आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. शेवटी, गणेश मूर्तींचं विसर्जन देखील अतिशय आनंदी आणि श्रद्धेच्या वातावरणात पार पडते.

हे ही वाचा: राज ठाकरेंच्या घरी बप्पांचं आगमन, उद्धव ठाकरेंसह कुटुंबही दर्शनाला, नेमकं काय साकडं घातलं?

इंडोनेशिया 

बाली हिंदू धर्मात भगवान गणेश ज्ञान, बुद्धी आणि कलांचे आश्रयदाता म्हणून पूजले जातात. येथील उत्सव भारतापेक्षा थोडा वेगळा आहे. बालीमध्ये, मूर्ती विसर्जन करण्याऐवजी, प्रतीकात्मक पूजेवर भर दिला जातो. लोक मंदिरांना भेट देतात, खास प्रसाद देतात आणि प्रार्थना करतात. बालीतील पारंपारिक कला आणि संस्कृतीमध्ये भगवान गणेशाचे सुंदर चित्रण केले आहे.

हे ही वाचा: Ganesh Chaturthi 2025 : गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातच का साजरी करतात? जाणून घ्या यामागची अध्यात्मिक कारणे

थायलंड  

थायलंडमध्ये, भगवान गणेशाला 'फिकानेट' म्हणून ओळखले जाते आणि ते समृद्धी तसेच यशाचे देवता मानले जातात. जरी भारताप्रमाणे थायलंडमध्ये गणेश चतुर्थी साजरी केली जात नसली तरी फिकानेटची पूजा ही थाई संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. बँकॉकसारख्या शहरात अशी अनेक मंदिरे आहेत जिथे लोक यश संपादन करण्यासाठी त्यांची पूजा करतात. थायलंडमध्ये जगातील सर्वात मोठी गणेशमूर्ती देखील आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp