राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन, उद्धव ठाकरेंसह कुटुंबही दर्शनाला, नेमकं काय साकडं घातलं?

Uddhav Thackeray meet raj Thackeray : उद्धव ठाकरे हे राज ठकरेंच्या घरी गणेशोत्सवा निमित्त आले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचं कुटुंबही आले होते. अशातच दोघांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. या भेटीत दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? असा अनेकांना प्रश्न उपस्थित झाला आहे.

Uddhav Thackeray meet raj Thackeray
Uddhav Thackeray meet raj Thackeray
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गणरायाचं थाटामाटात आगमन

point

उद्धव ठाकरेंसह कुटुंबाने घेतलं बाप्पांचं दर्शन

point

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली

Uddhav Thackeray meet Raj Thackeray: राज्यात आज 27 ऑगस्ट रोजी गणरायाचं थाटामाटात आगमन होताना दिसत आहे. दोघेही बंधू गेल्या काही दिवसांआधी मराठीच्या मुद्द्यावर वरळी डोंम येथे एकत्र आले होते. त्यानंतर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे राज ठकरेंच्या घरी गणेशोत्सवा निमित्त आले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचं कुटुंबही आले होते. दोघांनीही फोटोसेशन केले आणि दोघांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. या भेटीत दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? असा अनेकांना प्रश्न उपस्थित होतोय.  

हे ही वाचा : मनोज जरांगेंनी केली गणपती बप्पांची आरती, मुंबईकडे कूच करण्याआधी फडणवीसांनी खेळली खेळी?

उद्धव ठाकरे आणि सहकुटुंबाने राज ठाकरेंच्या बप्पांचा घेतला आशीर्वाद

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार असल्याची माहिती शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी दिली. याचपार्श्वभूमीवर दोघांचीही भेट ही महत्वाची मानली जातेय. राज ठाकरे हे गेल्या महिन्यात उद्धव ठकरेंच्या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे आपलं सहकुटुंब सोबत गेऊन राज ठाकरेंच्या घरी आले. या झालेल्या भेटीत दोघांमध्ये राजकीय चर्चा होणार का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसतो.आजच्या भेटीचा व्हिडिओ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. 

याआधी दोघेही एकमेकांना भेटले होते, तेव्हा दोघांनीही बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेसमोर फोटोसेशन केलं होतं. आता त्यांनी गणपत्ती बप्पासमोर फोटो सेशन केलं असून त्यांनी प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्या एकत्रित फोटोसमोर फोटो सेशन केलं आहे.हे छायाचित्र न काही बोलता खूप काही सांगून जाणारं आहे. 

हे ही वाचा : गणपती बप्पाचं आगमन आणि विसर्जन करताना सावधान, मुंबईतील हे पूल धोकादायक,उत्सवाला लागेल गालबोट

उद्धव ठाकरे प्रथम शिवतीर्थावर

दरम्यान, गणपत्ती बप्पाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे प्रथमच राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर गेले. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी एक नवीन घर बांधलं. आता तेच घर गणेशोत्सवादरम्यान चांगलं सजवलं आहे. दोघांमध्ये नेमकी राजकीय चर्चा काय झाली? तसेच उद्धव ठाकरेंनी गणपती बप्पाकडे काय मागितलं असे अनेकांना वाटू लागले आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp