गणेशोत्सवाच्या काळात सायबर भामट्यांपासून सावध... बाप्पाचं ऑनलाइन दर्शन आणि प्रसादाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक

सायबर फसवणूक करणारे गणेशभक्तांना ऑनलाइन लाइव्ह दर्शनाचे आश्वासन देऊन आणि ऑनलाइन कुरिअरद्वारे मोदकांचा प्रसाद पाठवतो, असं सांगून त्यांची फसवणूक करतात.

गणेशोत्सवाच्या काळात सायबर भामट्यांपासून सावध...
गणेशोत्सवाच्या काळात सायबर भामट्यांपासून सावध...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गणेशोत्सवाच्या काळात सायबर भामटे घेतात फायदा

point

बाप्पाचं ऑनलाइन दर्शन आणि प्रसादाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक

Ganesh Chaturthi 2025: मुंबईसह देशभरात गणेशोत्सव 2025 ला सुरूवात झाल आहे. सर्वत्र गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष होताना पाहायला मिळतंय. यानिमित्ताने मोठ्या संख्येने भाविक सार्वजनिक गणेश मंडळांना देणग्या देतात, मूर्तींचं बुकिंग करतात आणि सजावटीचं तसेच प्रसादाचं साहित्य ऑनलाइन खरेदी करतात. मात्र, या गणेशोत्सवाच्या काळात सायबर भामटे याचा फायदा घेतात. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सणासुदीच्या काळात ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारींमध्ये 30 टक्क्यांनी वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं. सायबर फसवणूक करणारे गणेशभक्तांना ऑनलाइन लाइव्ह दर्शनाचे आश्वासन देऊन आणि ऑनलाइन कुरिअरद्वारे मोदकांचा प्रसाद पाठवतो, असं सांगून त्यांची फसवणूक करतात. सायबर चोरटे बनावट प्लॅटफॉर्मद्वारे लोकांची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील देखील चोरतात.

बनावट वेबसाइट्सद्वारे फसवणूक  

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत असे काही ट्रेंड दिसून आले आहेत. गेल्या वर्षीही अनेक लोकांनी अशा बनावट वेबसाइट्स आणि सोशल मीडिया पेजद्वारे ऑनलाइन देणग्या आणि प्रसादासाठी पैसे ट्रान्सफर केल्यानंतर त्या बदल्यात काहीही न मिळाल्याबद्दल तक्रार केली होती. मोदकांचा प्रसाद, फोटो आणि लाईव्ह दर्शन इत्यादींच्या नावाखाली 5100, 11000, 21000 ते 51000 रुपयांच्या ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

हे ही वाचा: गणेश चतुर्थी 2025: “गणपती बाप्पा मोरया” असा जयघोष का केला जातो? ‘मोरया’ शब्दामागचा इतिहास माहितीये?

दादर पोलिसांनी केला होता गुन्हा दाखल  

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सायबर भामटे 'गणेश मंडळासाठी देणगी' किंवा  ‘दर्शन घेण्यासाठी व्हीआयपी पास' या नावाने लोकांना बनावट क्यूआर कोड, बनावट वेबसाइट आणि सोशल मीडिया लिंक पाठवतात आणि त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करतात. 2023 मध्ये गणेशोत्सवादरम्यान 'उत्सव' नावाच्या वेबसाइटकडून लाईव्ह दर्शन आणि पूजेच्या नावाखाली पैसे आकारण्यात आल्याबद्दल श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ऑनलाइन देणगीच्या नावाखाली तक्रारदाराची 50,000 रुपयांची फसवणूक झाली होती.

सायबर सुरक्षिततेच्या काही टिप्स 

कोणत्याही अनधिकृत वेबसाइट किंवा अॅपवरून गणपती दर्शन आणि प्रसादाच्या नावाने व्यवहार करू नका.

फक्त मंदिर ट्रस्टच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरून सेवा मिळवा.

फक्त अधिकृत वेबसाइट किंवा विश्वसनीय UPI आयडीवर देणगी द्या.

QR कोड स्कॅन करण्यापूर्वी स्त्रोताची पुष्टी करा.

कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी URL काळजीपूर्वक तपासा.

देणग्यांच्या नावाखाली सोशल मीडियावर शेअर केलेल्या पेमेंट लिंक्स टाळा.

बँका किंवा मंडळे कधीही ओटीपी किंवा पिन मागत नाहीत, असे कॉल ताबडतोब डिस्कनेक्ट करा.

कोणताही ऑनलाइन व्यवहार किंवा देणगी देण्यापूर्वी काळजी घ्या.

ज्या संस्थेला तुम्ही पैसे देत आहात त्या संस्थेची सत्यता तपासा.

संशयास्पद ऑनलाइन व्यवहारांची तक्रार सायबर हेल्पलाइन 1930 वर करा.

हे वाचलं का?

    follow whatsapp