गणेश चतुर्थी 2025: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काय बनवायचं? घरीच सोप्या पद्धतीनं बनवा बाप्पाच्या आवडीचे 'हे' 6 पदार्थ
गणेशोत्सवाच्या या काळात बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य केले जातात. अशातच, गणरायाच्या नैवेद्यासाठी काय बनवायचं? असा प्रश्न गृहिणींच्या मनात येत असतो.

बातम्या हायलाइट

बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा 'हे' खास पदार्थ

गणेशोत्सवासाठी 'या' खास पदार्थांची रेसिपी वाचा..
Ganesh Chaturthi 2025: दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला मोठ्या थाटामाटात गणेशोत्सवाची सुरूवात होते. महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात लोकप्रिय असणारा हा सण विशेषत: कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या या काळात बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य केले जातात. अशातच, गणरायाच्या नैवेद्यासाठी काय बनवायचं? असा प्रश्न गृहिणींच्या मनात येत असतो. आज आम्ही तुम्हाला बाप्पाला प्रिय असणाऱ्या काही खास पदार्थांबद्दल सांगणार आहोत.
1. मोदक: गणेश चतुर्थीच्या सणाच्या काळात गणपतीला नैवेद्य म्हणून मोदक अर्पण केला जातो. हा पदार्थ गणरायाला अतिशय प्रिय असल्याचं सांगितलं जातं. नारळाचा किस, गुळ आणि वेलचीचं सारण तयार करून ते तांदळाच्या किंवा गव्हाच्या पिठाच्या आवरणात भरलं जातं. त्यानंतर, त्यांना चांगला आकार देऊन ते तळले किंवा उडकले जातात.
2. पूरणपोळी: पूरणपोळी हा महाराष्ट्रातील लोकांच्या अत्यंत आवडीचा गोड पदार्थ आहे. आधी गुळ आणि डाळ व्यवस्थित शिजवून त्याचं छान मिश्रण तयार केलं जातं. त्यानंतर, ते मिश्रण एकत्रित बारीक करून पीठाच्या गोळ्यात भरलं जातं आणि त्याची पोळी लाटली जाते.
हे ही वाचा: Govt Job: रेल्वेत नोकरी करायची आहे? मग 'पश्चिम रेल्वे'च्या 'या' भरतीची संधी सोडू नका... लवकरच करा अप्लाय
3. श्रीखंड: श्रीखंड ही चक्का दह्यापासून बनवलेली एक मलाईदार मिठाई आहे. त्यात गोडवा येण्यासाठी साखर घालून ते गोड केले जाते आणि आवश्यकतेनुसार, केशर, वेलची आणि काजू घालून चविष्ठ बनवले जाते.
4. रव्याचा शीरा: हा रवा, तूप, साखर आणि दुधापासून बनवलेला एक स्वादिष्ट गोड पदार्थ आहे. तो केशर, वेलची आणि सुकामेवा घालून सर्व्ह केला जातो. हा पदार्थ बऱ्याचदा गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मॉल म्हणावं की स्विमिंग पूल? नागरिकांनी रस्त्यावरच मारल्या बेडूक उड्या..ओबेरॉय मॉलची 'अशी' अवस्था कधी पाहिली नसेल
5. करंजी: हा पदार्थ महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ आहे. नारळ आणि गुळाचं सारण असलेली करंजी गणेशोत्सवात गोडाचा पदार्थ म्हणून बनवला जातो.
6. गव्हाची खीर: महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून गव्हाची खीर केली जाते. गहू भिजवून ते मध्यम बारीक केले जातात. त्यानंतर त्यात गुळ घालून ते मऊसूत शिजवले जातात. ही खीर दुधासोबत देखील खाल्ली जाते.