Govt Job: रेल्वेत नोकरी करायची आहे? मग 'पश्चिम रेल्वे'च्या 'या' भरतीची संधी सोडू नका... लवकरच करा अप्लाय

पश्चिम रेल्वेकडून अप्रेन्टिसशिपच्या पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 30 ऑगस्ट पासून सुरू होणार असल्याची माहिती आहे.

'पश्चिम रेल्वे'कडून निघाली मोठी भरती...
'पश्चिम रेल्वे'कडून निघाली मोठी भरती...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पश्चिम रेल्वेकडून नवीन भरती जाहीर

point

काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

Govt Job: रेल्वे भरती सेल (RRC), पश्चिम रेल्वेकडून अप्रेन्टिसशिपच्या पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 30 ऑगस्ट पासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. पश्चिम रेल्वेमध्ये अप्रेंटिस म्हणून सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. पश्चिम रेल्वेमध्ये अप्रेन्टिसशिपसाठी एकूण 2865 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सामान्य (Open) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1150 पदे, एससी (SC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 433 पदे, एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 215 पदे, ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 778 पदे आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण 289 पदे आरक्षित आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. 

वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. एसटी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि अपंग उमेदवारांना 10 वर्षे उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. 

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी भारताच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी आणि 12 वी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांकडे NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेकडून राष्ट्रीय व्यापारात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. तसेच, उमेदवारांची निवड 10 वी आणि 12 वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.

हे ही वाचा: पुतण्यावर केला बलात्काराचा आरोप, पण कोर्टाने काकीलाच सुनावली मोठी शिक्षा... फक्त एक पुरावा अन् गेमच पलटला

अर्जाचं शुल्क

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना फी देखील भरावी लागेल. उमेदवारांना 100 रुपये अर्जाचं शुल्क आणि 41 रुपये प्रक्रियेसाठी शुल्क म्हणून भरावे लागतील. याव्यतिरिक्त, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना अर्जाच्या शुल्कात सूट देण्यात आली आहे. मात्र, या प्रवर्गातील उमेदवारांना प्रक्रिया शुल्क म्हणून 41 रुपये भरावे लागतील.

हे ही वाचा: दगडाने ठेचलं आईचं डोकं, वडिलांचा गळाच चिरला अन् भावाला तर... नंतर मित्राला फोन केला आणि सांगितली 'ती' गोष्ट

आवश्यक डॉक्यूमेंट्स

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे पासपोर्ट साइज फोटो, दहावी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास), आयटीआय सर्टिफिकेट आणि इतर आवश्यक डॉक्यूमेंट्स असणं आवश्यक आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp