pune crime : शिक्षण घेण्याच्या वयात 15 वर्षाच्या मुलाकडून 14 वर्षाची मुलगी गर्भवती, पोटात वाढत होतं 8 महिन्यांचं बाळ

Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका अल्पवयीन मुलाने 14 वर्षांच्या मुलीला गर्भवती केलं आहे. ती मुलगी सध्या 8 महिन्यांची गर्भवती आहे. संबंधित प्रकरण अत्यंत धक्कादायक असून गर्भवती मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

pune crime 14 years old girl pregnant in pune Incidence
pune crime 14 years old girl pregnant in pune Incidence
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात एक धक्कादायक प्रकरण समोर

point

15 वर्षाच्या मुलाकडून 14 वर्षाची मुलगी गर्भवती

point

पोटात 8 महिन्यांचं बाळ

Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका अल्पवयीन मुलाने 14 वर्षांच्या मुलीला गर्भवती केलं आहे. ती मुलगी सध्या 8 महिन्यांची गर्भवती आहे. संबंधित प्रकरण अत्यंत धक्कादायक असून गर्भवती मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे पुण्यातील खडकीl एकच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

आईच्या पायाखालची जमीन सरकली

14 वर्षीय गर्भवती मुलीला आकडी आली असता, तिच्या आईने तिला रुग्णालयात नेले. त्यानंतर पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. तसेच डॉक्टरांनी तिची तपासणीही केली होती. तपासादरम्यान, डॉक्टरांना धक्कादायक माहिती समजली असता, मुलीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकून गेली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलगी 8 महिन्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनं खडकीत एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. 

संबंधित प्रकरणात मुलीच्या आईने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी एका 15 वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा आणि मुलगी हे दोघेही एकमेकांना गेली दोन वर्षांपासून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. 

दोन वर्षांपासून प्रेमसंबंध 

गेली दोन वर्षांपासून त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मुलाने मागील दोन वर्षांपासून मुलीसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्याचं पोलिस तपासातून समोर आलं आहे. एका महिलेच्या घरी तिला नेऊन तिचं लैंगिक शोषण करायचा. यातूनच अल्पवयीन तरुणी गर्भवती राहिली होती. संबंधित प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा : मॉलच्या वॉशरुममध्ये तरुण-तरुणीचे अश्लील चाळे, कर्मचाऱ्याचा गंभीर आरोप अन् तरुण भिडला, थेट पोलिसांची एंट्री

शिक्षण घेण्याच्या वयात मुलांनी केलेल्या अशा कृत्याने मुलांच्या भविष्यावर मोठं प्रश्चचिन्ह उपस्थित होताना दिसते. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात अशा घटना घडू लागल्याने येणाऱ्या पिढीच्या भविष्यावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp