आता WhatsApp वर मिळतील सर्व सरकारी सुविधा... राज्य सरकारचा मोठा निर्णय!
महाराष्ट्र सरकराने राज्यातील नागरिकांना सर्व सरकारी सुविधा अधिक सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मोठं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.

बातम्या हायलाइट

आता WhatsApp वर मिळतील सर्व सरकारी सुविधा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नवे आदेश
Maharashtra Government Facilities: महाराष्ट्र सरकराने राज्यातील नागरिकांना सर्व सरकारी सुविधा अधिक सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मोठं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. आता 'आपले सरकार' पोर्टल तसेच व्हॉट्सअॅपवर सर्व गव्हर्नमेंट-टू-सिटिझन (G2C) सेवा प्रदान करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत सांगितलं की, सुरुवातीला प्रत्येक तालुक्यात 10-12 गावांचा समूह तयार करावा. या गावातील गावकऱ्यांच्या गरजेनुसार सेवा पुरवल्या पाहिजेत आणि त्यासाठी विशेष पथके तयार करावीत जेणेकरून वेळेवर सेवा मिळतील.
कागदपत्रांची संख्या कमी करावी
संबंधित सेवांसाठी अर्ज करताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची संख्या कमी करावी, जेणेकरून सामान्य नागरिकांना ते सोपे होईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. तसेच, सेवांच्या गुणवत्तेचं मूल्यांकन करण्यासाठी तृतीय पक्ष म्हणजेच थर्ड पार्टी एजन्सींकडून स्वतंत्र ऑडिट केले जातील.
हे ही वाचा: नवी नवरी फासावर लटकलेल्या अवस्थेत... माहेरचे म्हणाले, “सासू पती आणि पत्नीच्या मध्ये झोपायची...”
सारखेच डॅशबोर्ड
नागरिकांना एकसमान अनुभव मिळावा यासाठी सर्व जिल्हा परिषदे, महानगरपालिका आणि विद्यापीठांचे डॅशबोर्ड सारखेच करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. याशिवाय, सेवा उपलब्ध करून देण्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि जलद असावी.
मल्टी-मॉडल सिस्टमवर भर
मुख्य सचिव राजेश कुमार यांनी संबंधित सेवांमध्ये अपीलची सुविधा देखील उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना केली. तसेच, प्रमाणपत्रे आणि इतर डॉक्यूमेंट्स ईमेल, पोर्टल आणि व्हॉट्सअॅप सारख्या मल्टी-मॉडल सिस्टमद्वारे उपलब्ध करून दिली पाहिजेत, जेणेकरून लोकांना कोणत्याही एका माध्यमावर अवलंबून राहावं लागू नये.
हे ही वाचा: गर्लफ्रेंडच्या मागोमाग मॉलच्या वॉशरूममध्ये घुसला बॉयफ्रेंड, तिथेच सुरू केले अश्लील चाळे आणि...
1,001 ऑनलाइन सेवा
सध्या 'आपले सरकार' पोर्टलद्वारे 1,001 सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यापैकी 997 सेवा आधीच ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. गेल्या 15 दिवसांत 236 नवीन सेवा जोडण्यात आल्या आहेत. आता अशा सुविधा व्हॉट्सअॅपशी देखील जोडण्यात याव्या, जेणेकरून गावापासून शहरापर्यंत प्रत्येक नागरिकाला सोपी, सुलभ आणि जलद सेवा मिळू शकेल, हेच सरकारचं ध्येय आहे. सरकारचा असा विश्वास आहे की या निर्णयामुळे ग्रामीण भागात डिजिटल प्रशासनाचा विस्तार होईल, त्याशिवाय लोकांचा वेळही वाचेल आणि सरकारी प्रक्रियांवरील विश्वास वाढेल.