Maharshtra Weather: पुन्हा कोसळणार दमदार पाऊस, कोकणासह नाशिकलाही येलो अलर्ट!

मुंबई तक

maharashtra weather today: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नुसार ताज्या अंदाजानुसार, 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये हवामानात बदल अपेक्षित आहेत.

ADVERTISEMENT

maharashtra weather (Grok)
maharashtra weather
google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नुसार

point

25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील विविध भागांतील हवामानात बदल

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) च्या ताज्या अंदाजानुसार, 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये हवामानात बदल अपेक्षित आहेत. मान्सूनचा जोर कायम असून, काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे.

हे ही वाचा : मुंबईत खळबळ! लोकमान्य टिळक स्थानकाच्या एसी कोचच्या शौचालयात लहान मुलाचा मृतदेह, सूरत येथून अपहण अन् भयंकर कांड

कोकण : 

कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे. ताशी 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज वर्तवला आहे. या विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

पश्चिम महाराष्ट्र :

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथे ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पूरस्थितीचा धोका असल्याने स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

हे वाचलं का?