मुंबईत खळबळ! लोकमान्य टिळक स्थानकाच्या एसी कोचच्या शौचालयात लहान मुलाचा मृतदेह, सूरत येथून अपहण अन् भयंकर कांड

mumbai crime : मुंबईतील लोकमान्य टिळकनगर येथून एक खळबजनक प्रकार उघडकीस आल आहे. कुशीनगर एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये एका शौचालयाच्या साफसफाई दरम्यान एका लहान मुलाचा मृतदेह पडला होता. सफाई कर्मचाऱ्यांनी या घडलेल्या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली असता, हे प्रकरण समोर आलं.

mumbai crime
mumbai crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील लोकमान्य टिळकनगर येथे खळबजनक प्रकार उघडकीस

point

एसी कोचमधील शौचालयात लहान मुलाचा मृतदेह

point

पहाटे 4 वाजता पोलीस तैनात

mumbai crime : मुंबईतील लोकमान्य टिळकनगर स्थानकावर एक खळबजनक प्रकार उघडकीस आला. कुशीनगर एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये एका शौचालयाच्या साफसफाई दरम्यान एका लहान मुलाचा मृतदेह आढळला होता. सफाई कर्मचाऱ्यांनी या घडलेल्या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. आरपीएफ आणि जीआरपीच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. पंचनाम्यानंतर मृतदेह हा शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला होता.

हे ही वाचा : पुण्यातील भररस्त्यात शाळेच्या आवारात तरुणींच्यात तुफान राडा, बॉयफ्रेंडला मेसेज केल्यानं लाथा बुक्क्यांनी मारहाण अन् वाद पेटला

सूत्रांकडून महत्त्वाची अपडेट 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी गुजरातच्या सूरत येथील अमरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीत आरोप लावण्यात आला होता की, लहान मुलाचे अपहरण हे त्याच्याच मावस भावाने केले होते. अमरोली पोलीस ठाणे परिसरात संबंधित प्रकरणाची तक्रार दाखल करत आरोपीचा पोलिसांनी मोबाईल ट्रेस करत कारवाई केली.

पहाटे 4 वाजता  लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोलीस पथक

संबंधित प्रकरणात पोलिसांचे पथक पहाटे 4 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहोचले आणि त्यांनी मुलाची तसेच आरोपीची माहिती जाणून घेतली. नंतर रेल्वे पोलिसांनी पथकाला सांगितलं की, रेल्वे स्थानकावर उभ्या असणार्‍या कुशीनगर एक्सप्रेसमधून एका मुलाचा मृतदेह सापडला होता.

फोटोमुळं खरं चित्र आलं समोर 

नंतर मृतदेहाचा फोटो सोशल मीडियाद्वारे अमरोली येथे पाठवण्यात आला होता. तेव्हा फोटोच्या आधारे हे आपलंच मुल असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर मुलीची हत्या आणि त्याच्या अपहरणाचं गंभीर स्वरुप समोर आलं आहे.

हे ही वाचा : तब्बल 18 वर्षानंतर तयार होणार 'दरिद्र योग' काही राशीतील लोकांना मिळणार मोठा फायदा

सध्या पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला असता, आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, सांगितले जातेय की, पीडितेचे कुटुंब मूळचे बिहारमधील सिवान जिल्ह्यातील आहे.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp