पुणे: तरुणींमध्ये तुफान हाणामारी, बॉयफ्रेंडला केला 'तो' मेसेज अन् मॅटरच झाला ना भाऊ!
Pune Crime : शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात तरुणींच्या दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीचं कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शिक्षणाचं माहेरघर पुण्यात तुफान राडा
बॉयफ्रेंडवरून दोन तरुणींचे गट भिडले
शाळेच्या आवारात घडली घटना
Pune Crime : शिक्षणाचं माहेरघर तसेच सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. पुणे शहराला मोठा इतिहास लाभलेला आहे. मात्र, पुणे तिथं काय उणे असं का नेहमी म्हटलं जातं हे आता नव्याने समोर आलं आहे. कारण आतापर्यंत आपण मुलांची तरुणांची फ्री स्टाईल हाणामारी पाहिली होती. पण, आता याच पुण्यातील तरुणींचा हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. याचं कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
हे ही वाचा : तब्बल 18 वर्षानंतर तयार होणार 'दरिद्र योग' काही राशीतील लोकांना मिळणार मोठा फायदा
माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केला?
एका तरुणीने माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केला? असा सवाल करत जाब विचारला. त्यानंतर दोन्ही तरुणींच्या टोळ्या एकमेकांमध्ये भररस्त्यात भिडल्या. दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पुण्यातील येरवडा परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे.
माझ्या बॉयफ्रेंडसा मेसेज का करते? असा एका तरुणीने दुसऱ्या तरुणीला मेसेज केला होता. याच कारणावरून दोघींमध्ये चांगलीच जुंपली. ही घटना येरवडा परिसरातील नेताजी शाळानजीक रात्री साडे दहा वाजता घडली. शाळेच्या आवारत ही घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मुलींची एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण
सुरूवातीला किरकोळ वादावरून झालेलं हे भांडण आता वादाचं कारण बनलं. दोन्ही गटातील मुलींनी एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्या एवढ्यावरच न थांबता त्यांनी एकमेकींना अगदी खालच्या भाषेत शिवीगाळ केली. मुलींची भांडणं पाहता मोठी गर्दी जमली. गर्दीतील लोकांनी हा घडलेला प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला असता, कोणीही काहीही ऐकत नव्हते.










