गर्लफ्रेंडच्या मागोमाग मॉलच्या वॉशरूममध्ये घुसला बॉयफ्रेंड, तिथेच सुरू केले अश्लील चाळे आणि...
बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एक प्रियकर आणि प्रेयसी मॉलमध्ये फिरायला गेले होते. मात्र, त्यावेळी ते दोघेही आत अश्लील कृत्य करत असल्याचा मॉलच्या कर्मचाऱ्यांनी आरोप केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मॉलच्या वॉशरूममध्ये प्रियकराचे गर्लफ्रेंडसोबत अश्लील चाळे
कर्मचाऱ्यांनी बघितलं अन् थेट पोलिसांनाच बोलावलं
कधीकधी प्रेमी युगुल असा काही वेडेपणा करतात, जे त्यांना अचानक महागात पडतं. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका जोडप्यानं असंच काहीसं केलं. दोघेही एका मॉलमध्ये फिरायला गेले होते. त्यावेळी प्रेयसीच्या अचानक पोटात दुखू लागलं आणि ती वॉशरूममध्ये गेली. त्यानंतर तिचा बॉयफ्रेंडही तिच्या मागे गेला. मात्र, त्यावेळी ते दोघेही आत अश्लील कृत्य करत असल्याचा मॉलच्या कर्मचाऱ्यांनी आरोप केला. त्यामुळे मॉलच्या कर्मचाऱ्यांनी प्रियकराला पकडून बाहेर काढलं.
कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं
तसेच, मॉल कर्मचाऱ्यांच्या मते, आपली चूक मान्य करण्याऐवजी, प्रियकर त्यांच्याशी भांडू लागला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. त्यानंतर, जोडप्याला पोलिस ठाण्यात नेण्यात आलं आणि तिथे दोघांच्या कुटुंबियांनाही बोलावण्यात आलं. त्यावेळी ‘अशी चूक पुन्हा करू नका’ अशी ताकीद देऊन पोलिसांनी दोघांनाही पीआर जामिनावर सोडलं.
मॉलच्या वॉशरूममध्ये अश्लील कृत्ये
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मोतीझील येथील एका मॉलमध्ये घडल्याची माहिती आहे. येथे सोमवारी (25 ऑगस्ट) कर्मचाऱ्यांनी एका जोडप्याला मॉलमधील वॉशरूममध्ये अश्लील कृत्ये केल्याच्या आरोपाखाली पकडलं. दोघेही सदर पोलीस ठाण्याच्या शेरपूर परिसरातील रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित प्रियकर अघोरिया बाजार-रामदयालू रोड येथील एका मॉलमध्ये काम करतो, तर प्रेयसी बारावीची विद्यार्थिनी आहे. मोतीझील येथील बाजारातून पुस्तक खरेदी केल्यानंतर दोघेही मॉलमध्ये फिरायला गेले होते.
हे ही वाचा: विवाहित तरुणीचे नातेवाईकासोबतच होते अनैतिक संबंध, गर्लफ्रेंडला लॉजवर घेऊन गेला अन् तोंडात कोंबली स्फोटकं!
प्रियकराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मॉलमध्ये फिरत असताना प्रेयसीच्या पोटात दुखू लागलं, त्यानंतर ती वॉशरूममध्ये गेली. तीव्र वेदना होत असल्याकारणाने तिच्या काळजीने तोही वॉशरूममध्ये गेला. दरम्यान, मॉलच्या कर्मचाऱ्यांनी खोटे आरोप करून त्यांना पकडलं आणि शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांनाही पोलिस स्टेशनमध्ये आणलं. पोलिस चौकशीत दोघांनीही सांगितले की ते एकमेकांना आठ वर्षांपासून ओळखतात. त्यांची घरे एकाच गावात अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहेत.










