विवाहित तरुणीचे नातेवाईकासोबतच होते अनैतिक संबंध, गर्लफ्रेंडला लॉजवर घेऊन गेला अन् तोंडात कोंबली स्फोटकं!

कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यात एका लॉजमध्ये प्रियकराने प्रेयसीच्या तोंडात स्फोटक पावडर चाकून तिची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Boyfriend put explosive powder in his girlfriends mouth lover killed him due to an immoral relationship
प्रियकराने लॉजवर नेऊन गर्लफ्रेंडची केली हत्या
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अनैतिक संबंधातून प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

point

तोंडात स्फोटक पावडर टाकून निर्घृणपणे हत्या

Crime News: कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक हत्येची घटना समोर आली आहे. भेरिया गावातील एका लॉजमध्ये प्रियकराने महिलेची हत्या केली आणि त्यानंतर त्याने तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच संबंधित प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हत्येमागचं कारण प्रेमसंबंध असल्याचं सांगण्यात येत आहे.

लग्नानंतर दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध 

मिळालेल्या माहितीनुसार, रक्षिता नावाच्या तरुणीचं लग्न केरळमध्ये काम करणाऱ्या एका स्थलांतरित कामगाराशी झालं होतं. मात्र, लग्नानंतर सुद्धा राक्षिताचे प्रकरणातील आरोपी सिद्धराजू सोबत प्रेमसंबंध होते. संबंधित घटनेच्या दिवशी रक्षिता आणि सिद्धूराजू एका लॉजमध्ये होते. त्यावेळी त्या दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला आणि हा वाद टोकाला पोहचला.

हे ही वाचा: अरे देवा.. गणपतीच्या आदल्या दिवशी कारखान्यातून मूर्तीकारच झाला पसार, बाप्पा आता कसं होणार?

तोंडात स्फोटक पावडर टाकून हत्या...  

त्यावेळी रागाच्या भरात आरोपीने रक्षिताच्या तोंडात स्फोटक पावडर टाकून तिची हत्या केली. घटनेनंतर आरोपीने मोबाईल फोनचा स्फोट झाल्यामुळे रक्षिताची हत्या झाल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिक लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांच्या मते, मृत महिला विवाहित असून तिचे तिच्या नात्यातील एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. पीडित तरणीच्या प्रियकरानेच तिची निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांच्या तपासात महिलेचा मृतदेह बेडवर पडलेला आढळला आणि तिचं तोंड स्फोटकाने उडवल्याचं दिसून आलं.

हे ही वाचा: Personal Finance: 25000 रुपये पगार असला तरी बनवा 100000000 रुपयांचा रिटायरमेंट फंड, वापरा 70:15:15 फॉर्म्युला!

दिशाभूल करण्याचा प्रयत्न  

पोलीस घटनास्थळी पोहचले असता तिथे जमिनीवर मोठ्या प्रमाणात रक्त पडल्याचं दिसलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉजमध्ये राहताना दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर आरोपीने पीडितेच्या तोंडात ज्वलनशील पदार्थ टाकला आणि स्फोट घडवून आणला. घटनेनंतर, आरोपीने महिलेचा मृत्यू मोबाईल फोनच्या स्फोटामुळे झाला असं सांगून इतरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp