बाप्पाच्या आगमनादिवशीच वरुणराजाची दमदार हजेरी, राज्यात पावसासह भक्तीचं वातावरण, जाणून घ्या हवामान
Maharashtra weather : भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रासाठी 27 ऑगस्ट रोजी हवामान अंदाज जारी केला आहे. राज्यात मान्सूनचा जोर कायम राहणार.

बातम्या हायलाइट

27 ऑगस्ट रोजी हवामानाचा अंदाज जारी

राज्यात मान्सूनचा जोर कायम

गणरायाच्या आगमनादिवशी वरुणराजाची हजेरी
Maharashtra Weather : भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रासाठी 27 ऑगस्ट रोजी हवामान अंदाज जारी केला आहे. राज्यात मान्सूनचा जोर कायम राहणार असून, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. गणरायाच्या आगमनासाठी वरुणराजाची हजेरी ही नैसर्गिकदृष्ट्या फलदायी ठरेल. तर 27 ऑगस्ट रोजीच्या एकूण राज्यातील हवामान विभागाबाबत जाणून घेऊयात.
हे ही वाचा : pune crime : शिक्षण घेण्याच्या वयात 15 वर्षाच्या मुलाकडून 14 वर्षाची मुलगी गर्भवती, पोटात वाढत होतं 8 महिन्यांचं बाळ
कोकण विभाग :
कोकण विभागातील विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकण भागात कमाल तापमान 32.8 अंश सेल्सियस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सियस राहण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या घाटमाथा आणि पायथ्याच्या परिसरात हवामान विभागाने जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि मध्यम पावसासह काही ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
विदर्भ आणि मराठवाडा :
विदर्भात नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया येथे मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यात नांदेड आणि हिंगोली येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.तसेच 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.
हे ही वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
उत्तर महाराष्ट्र :
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात हवामान विभागाने हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.