गणेश चतुर्थी 2025: बाप्पाला मोदकांचा नैवेद्य का दाखवला जातो? पुराणात काय सांगितलंय?

गणरायाला मोदक अतिशय प्रिय असल्याकारणाने त्यांना मोदकांचा नैवेद्य दाखवला जात असल्याचं म्हटलं जातं. यामागचं पौराणिक कारण जाणून घेऊया.

बाप्पाला मोदकांचा नैवेद्य का दाखवला जातो?
बाप्पाला मोदकांचा नैवेद्य का दाखवला जातो?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाप्पाला मोदकांचा नैवेद्य का दाखवला जातो?

point

पुराणात नेमकं काय सांगितलंय?

Ganesh Chuturthi 2025: हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पाचं मोठ्या थाटामाटात स्वागत केलं जातं. बाप्पा घरी विराजमान झाल्यानंतर त्यांना आवर्जून मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. गणरायाला मोदक अतिशय प्रिय असल्याकारणाने त्यांना मोदकांचा नैवेद्य दाखवला जात असल्याचं म्हटलं जातं. यामागचं पौराणिक कारण जाणून घेऊया.

अमृतापासून बनवलेला मोदक 

पौराणिक कथेनुसार, एकदा माता पार्वतीला देवतांनी अमृतापासून बनवलेला मोदक भेट म्हणून दिला होता. तो दिव्य मोदक पाहून भगवान गणेश आणि त्यांचा भाऊ कार्तिकेय आईकडून तो मोदक मागू लागले. मग देवी पार्वतीने त्या दोघांना मोदकाबद्दल सांगितलं त्या म्हणाल्या, की त्या मोदकाच्या सुगंधानेच अमरत्व प्राप्त होऊ शकते. अशातच, जो त्याचा सुगंध घेईल तो सर्व शास्त्रे आणि कलांचा ज्ञानी बनेल.

गणपती आणि कार्तिकेय यांच्यात स्पर्धा  

देवी पार्वतीकडून मोदकाचे असं महत्त्व ऐकल्यानंतर, गणपती आणि कार्तिकेय यांनी तो खाण्याची इच्छा व्यक्त केली. यावर देवीने सांगितले की “जो कोणी धार्मिक आचरणाद्वारे श्रेष्ठता प्राप्त करेल आणि प्रथम पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करेल, मी त्याला हे मोदक देईन.” देवी पार्वतीचं हे बोलणं ऐकल्यानंतर, कार्तिकेय मोरावर बसून पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाले. मात्र, भगवान गणेशाने त्यावेळी दुसरी पद्धत अवलंबली. हुशार गणपती बाप्पांनी त्यांच्या आई-वडिलांभोवती म्हणजेच माता पार्वती आणि भगवान शंकराची प्रदक्षिणा घातली हेच त्यांचे जग असल्याचं सांगितलं.

हे ही वाचा: गणेश चतुर्थी 2025: गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राला पाहणं अशुभ का मानलं जातं? चुकून पाहिलं तर काय होतं?

हुशारीने जिंकली स्पर्धा 

मग माता पार्वती म्हणाल्या की “सर्व पवित्र ठिकाणी स्नान करणे, देव-देवतांचा आदर करणे, उपवास करणे, यज्ञ करणे, योगासने करणे, मंत्र आणि आत्मसंयम करणे, हे सर्व आई आणि वडिलांच्या पूजेच्या 16 व्या भागाइतकेही असू शकत नाही. त्यामुळे मी तुला हा दिव्य मोदक देत आहे.” सर्व शुभ कार्यांमध्ये आणि पूजेमध्ये सर्वात आधी तुझी पूजा होईल." तो मोदक मिळाल्यामुळे बाप्पाला खूप आनंद झाला आणि तेव्हापासून मोदक हा बाप्पांच्या आवडीचा पदार्थ बनला.

हे ही वाचा: गणेश चतुर्थी 2025: “गणपती बाप्पा मोरया” असा जयघोष का केला जातो? ‘मोरया’ शब्दामागचा इतिहास माहितीये?

आणखी एका पौराणिक कथेनुसार...  

एका पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान परशुरामांनी गणपती बाप्पावर हल्ला केल्यामुळे त्यांचा एक दात तुटला. त्यामुळे त्यांना नीट खाता येत नव्हते. मग त्यांच्यासाठी मऊ मोदक तयार करण्यात आले. त्यावेळी बाप्पांनी ते आवडीने फस्त केले आणि तेव्हापासून मोदक बाप्पाला प्रिय झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp