4 वर्षांच्या मुलाला दिलं उंदीर मारण्याचं औषध, नंतर पती आणि पत्नीने खोलीत गळफास घेत... नेमकं काय कारण?
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे एका व्यावसायिकाने आपल्या 4 वर्षांच्या मुलाची हत्या केली आणि नंतर आपल्या पत्नीसह आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

बातम्या हायलाइट

4 वर्षांच्या मुलाला दिलं उंदीर मारण्याचं औषध अन्...

व्यावसायिकाने पत्नीसह गळफास घेत केली आत्महत्या
Crime news: उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यावसायिकाने आपल्या 4 वर्षांच्या मुलाची हत्या केली आणि नंतर आपल्या पत्नीसह आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या घटनेत त्या निष्पाप मुलाला विषबाधा झाली आणि नंतर जोडप्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे संबंधित व्यावसायिक अस्वस्थ असून तो कर्जबाजारी होता, असं सांगितलं जात आहे.
36 पानांची सुसाईड नोट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख पटली असून ती 35 वर्षीय सचिन ग्रोव्हर, ३० वर्षीय पत्नी शिवांगी आणि ४ वर्षीय मुलगा फतेह अशी असल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी व्यावसायिकाने 36 पानांची सुसाईड नोट देखील लिहिली आहे. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून सुसाईड नोट देखील तपासासाठी पाठवण्यात आली आहे. ही घटना ही घटना रोजा पोलीस स्टेशन परिसरातील दुर्गा एन्क्लेव्ह कॉलनीमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी घरात कोणतीही हालचाल नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून पाहिले तर त्यांना खोलीत दोघांचेही मृतदेह फासावर लटकलेले दिसले. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
हे ही वाचा: गणेशोत्सवाच्या काळात सायबर भामट्यांपासून सावध... बाप्पाचं ऑनलाइन दर्शन आणि प्रसादाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक
त्यावेळी खोलीत 4 वर्षांचा मुलगा बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडला होता आणि पती-पत्नीचे मृतदेह घराच्या दोन्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये फासावर लटकलेले होते. कुटुंबियांनी त्या तिघांना रुग्णालयात नेलं मात्र तिथे डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केलं.
हे ही वाचा: गणेश चतुर्थी 2025: गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राला पाहणं अशुभ का मानलं जातं? चुकून पाहिलं तर काय होतं?
मुलाला उंदीर मारण्याचं विष दिलं
डॉक्टरांनी सांगितलं की 4 वर्षांच्या मुलाला विष देण्यात आलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे पती आणि पत्नीने आधी मुलाला उंदीर मारण्याचं विष दिलं. त्यानंतर दोघांनीही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीचा मृतदेह बेडरूममध्ये दोरीने लटकलेल्या अवस्थेत आढळला तर पतीने ड्रॉइंग रूममध्ये दोरीने गळफास घेतल्याचं आढळलं. सध्या पोलिस कुटुंबातील इतर सदस्यांची चौकशी करत आहेत. या घटनेचं नेमके कारण काय आहे, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या तिघांच्या मृत्यूने कुटुंबातील इतर सदस्यांना धक्का बसला आहे.