पत्नीचे शेजाऱ्याशी सुरु होते अनैतिक संबंध..नवऱ्याला समजलं अन् घडली सर्वात भयंकर घटना! मर्डर मिस्ट्री वाचून थरकाप उडेल

Shocking Murder Case Viral News :  उत्तरप्रदेशच्या सहारनपूरमध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. त्या व्यक्तीच्या पत्नीच्या प्रियकरानेच त्याची त्याची निर्घृण हत्या केली. आरोपीने त्या व्यक्तीवर चाकूने वार करत त्याचा खून केला.

Shocking Murder Case Viral News
Shocking Murder Case Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीचे शेजारच्याशी होते अनैतिक संबंध

point

नवऱ्याला समजताच घडलं भयंकर

point

त्या गावात नेमकं घडलं तरी काय?

Shocking Murder Case Viral News :  उत्तरप्रदेशच्या सहारनपूरमध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. त्या व्यक्तीच्या पत्नीच्या प्रियकरानेच त्याची त्याची निर्घृण हत्या केली. आरोपीने त्या व्यक्तीवर चाकूने वार करत त्याचा खून केला. पत्नीच्या प्रियकराला विरोध केल्याने दोघांमध्ये वादविवाद होत होते. त्यानंतर आरोपीने त्याच्या प्रेयसीच्या पतीला मारलं. या हत्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मंटू सिंह ( 32)  असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. 

पत्नीचे शेजारच्याशी होते अनैतिक संबंध

सहारनपूर जनपदच्या बडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या शिमलाना येथे शनिवारी रात्री अनैतिक संबंधांमुळे मोठा हत्याकांड झाला. आरोपीने चाकूने वार करत मंटू सिंहची हत्या केली. मंटूच्या पत्नीसोबत त्यांचा शेजारी सौरभचं अफेअर सुरु होतं. 

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: तब्बल 26 लाख लाडक्या बहिणी ठरणार अपात्र? सरकार आता कारवाईच्या मूडमध्ये!

या प्रेमप्रकरणामुळे वादविवाद झाला होता. पण शनिवारी रात्री सौरभ आणि मंटू यांच्यात मोठा वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात सौरभने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मंटू गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. कुटुंबियांनी मंटूला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी मंटूला मृत घोषित केलं. 

या हत्याप्रकरणाची माहिती मिळताच, पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. मृताच्या कुटुंबियांनी याप्रकरणी आरोपी सौरभ, त्याचे काका संजीव आणि एक अन्य व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. 

हे ही वाचा >> जुनी वृक्ष कापू नका तर... पुण्यातील धारीवाल फाऊंडेशनचं पुनर्रोपण अभियान

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. दरम्यान, आरोपी घटना घडल्यापासून फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस अधिकारी रविकान्त पराशर यांनी म्हटलं, शिमलाना गावात राहणारा मंटू आणि सौरभ यांच्यात वाद झाला होता. याचदरम्यान सौरभने मंटूची हत्या केली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp