33 वर्षीय तरुणासाठी महिलेनं नवऱ्याला बॉयफ्रेंडच्या मदतीने.. रेल्वे रुळावर जाळलेला पतीचा पाय अन्...

मुंबई तक

Extra marital affair : देशभरात अनैतिक संबंधाच्या अनेक घटना आता समोर येऊ लागल्या आहेत. या अनैतिक संबंधामुळे अनेकांचं संसार उघड्यावर पडले आहेत, तर काहींचे संसार मोडल्याचं चित्र आहे. एक अशीच घटना उघडकीस आली आहे.

ADVERTISEMENT

extra marital affair (grok)
extra marital affair
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देशभरात अनैतिक संबंधाच्या घटना

point

महिलेनं बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला संपवलं

point

रेल्वेरुळावर जळता पाय

Extra marital affair : देशभरात अनैतिक संबंधाच्या अनेक घटना आता समोर येऊ लागल्या आहेत. या अनैतिक संबंधामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत, तर काहींचे संसार मोडल्याचं चित्र आहे. एक अशीच घटना उघडकीस आली आहे. महिलेनं आपल्या 33 वर्षीय तरुणासाठी आपल्या 56 वर्षीय पतीची हत्या केली आहे. संबंधित प्रकरणात आरोपींना मदत करणाऱ्यांच्या पोलिसांनी  मुसक्या आवळल्या आहेत. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये मीनाक्षम्मा आणि तिचा प्रियकर प्रदीप आणि त्यांचे इतर दोन मित्र सिद्धेश आणि विश्वास अशी नावे समोर आली आहेत. तसेच मृत पतीचे नाव सुब्रमण्यम (वय 60) अशी नावे आहेत. ही घटना कर्नाटकातील चिकमंगलूर येथील आहे. 

हे ही वाचा : ऑनर किलिंगनं नांदेड हादरलं! तरुणीचे विवाहबाह्य संबंध, बॉयफ्रेंडसोबत सापडली सासरच्या घरात, नंतर वडिलांनी खोल विहिरीतच दिलं ढकलून

एकूण प्रकरण काय? 

संबंधित प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मीनाक्षम्माला न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सोमवारी न्यायलयीन कोठडी सुनावली. पोलिसांनुसार, 2 जून रोजी मीनाक्षम्माने कुदर पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणाची तक्रार दाखल करत नमूद केलं होतं की, सुब्रमण्यम 31 मे रोजी बाहेर गेले होते आणि त्यानंतर ते पुन्हा घरीच परतले नाही. संबंधित तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं. 

या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सुब्रमण्यच्या मोबाईलचा फोन ट्रॅक केला, 3 जून रोजी रेल्वे पोलिसांनी कदुर पोलिसांना रेल्वेच्या फलाटावरील ट्रॅकवर अर्धा जळालेला मृतदेह पाहिला. तसेच उर्वरित मृतदेहाचे तुकडे गोळा केले. सीसीटीव्ही फूटेज पाहिल्यानंतर प्रदीप, सिद्धेस आणि विश्वास हे तिघेजण एका कारमधून प्रवास करताना दिसले होते. 

हे वाचलं का?

    follow whatsapp