'मृतदेहासोबत रेप करायला मजा यायची..', नराधमाने 30 अल्पवयीन मुलांचा केला बलात्कार! संतापजनक घटनेनं परिसर हादरला!

Rape Case Crime Story : जवळपास 30 मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा सीरिएल किलर रविंदर कुमार, तेव्हा अल्पवयीन होता जेव्हा त्याने पहिल्या मुलाला वासनेचं शिकार बनवलं होतं.

मुलाने आईवर संशय घेतल्याने बलात्कार केला. (छायाचित्र: प्रातिनिधिक)
Rape Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नराधमाने सात वर्षात तीस मुलांवर केला बलात्कार

point

पोलिसांसमोर आरोपी रविंदरने खतरनाक खुलासा केला अन्..

point

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?

Rape Case Crime Story : जवळपास 30 मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा सीरिएल किलर रविंदर कुमार, तेव्हा अल्पवयीन होता जेव्हा त्याने पहिल्या मुलाला वासनेचं शिकार बनवलं होतं. रविंदरने 7 वर्षात 30 मुलांचा बलात्कार केला आणि त्यांना मारून टाकलं. नराधमाने दिल्ली एनसीआर आणि उत्तर प्रदेशच्या पश्मिम भागात अत्याचाराचे गंभीर गुन्हे केले होते. 

बेपत्ता झालेल्या मुलाचे आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी त्या तक्रारीचा फॉलोअप घेतला नाही, असं म्हटलं जातंय. त्याचाच फायदा आरोपी रविंदरने घेतला होता. त्यामुळे आरोपीने अनेक मुलांना शिकार बनवलं आणि याबाबत कोणालाही माहित झालं नाही. पण काही दिवसांनी पोलिसांनी रविंदर कुमारला अटक केली. पण चौकशीदरम्यान, त्याने जो खुलासा केला, ते पाहून पोलिसही थक्क झाले. 

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: तब्बल 26 लाख लाडक्या बहिणी ठरणार अपात्र? सरकार आता कारवाईच्या मूडमध्ये!

पोलिसांसमोर आरोपी रविंदरने खतरनाक खुलासा केला अन्..

आरोपीच्या निशाण्यावर 6 ते 12 वर्षांची मुलं होती. जेव्हा त्याला पकडलं, तेव्हा एका हत्येचा तपास सुरु होता. पण रविंदरने स्वत: खतरनाक खुलासा केला. त्याने म्हटलं, मी मुलांचं अपहरण केलं, त्यांच्यासोबत बलात्कार केला आणि त्यांना मारून टाकलं. मुलांच्या मृतदेहासोबतही बलात्कार केला. मला यात मजा वाटत होती. 

2008 मध्ये रविंदर उत्तरप्रदेशच्या कासगंज येथून दिल्लीला आला होता. त्यावेळी त्याचं वय 18 वर्ष होतं. त्याचे वडील प्लम्बरचं काम करायचे. दिल्लीला आल्यावर तो दारू आणि ड्रग्जचा व्यसनी झाला. तसच त्याला पॉर्न व्हिडीओ बघण्याची सवय लागली. आरोपीनं म्हटलं की, तो प्रत्येक रात्री दारू प्यायचा आणि अल्पवयीन मुलांचा शोध घ्यायचा. त्यानंतर त्यांना पकडून सुनसान जागेवर न्यायचा. तिथे त्यांचा बलात्कार करायचा आणि नंतर त्यांची हत्या करायचा. 

हे ही वाचा >> मुलगी बनून न्यूड व्हिडीओ रेकॉर्ड करायचे अन्..2 सायबर भामट्यांनी 145 लोकांना घातला गंडा! कसे अडकले पोलिसांच्या जाळ्यात?

वर्ष 2014 मध्ये पोलिसांनी आरोपी रविंदरला पहिल्यांदा पकडलं होतं. परंतु, पुरावे नसल्याने त्याला जामीन झाला. वर्ष 2015 मध्ये 6 वर्षांच्या मुलाच्या अपहरणच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती. यावेळी पोलिसांकडे त्याच्याविरोधात सबळ पुरावे होते. त्यामुळे मजबूत चार्जशीट बनवण्यात आली. मे 2023 मध्ये कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो जेलमध्ये आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp