मुंबईतील गणेशोत्सवात AI कॅमेऱ्याद्वारे गुन्हेगारांवर करडी नजर, हजारो मुंबई पोलिसांची सुरक्षेसाठी ऑन ड्यूटी

मुंबई तक

Ganesh Festival 2025 : विशेषत: नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. अनेक मोठ्या गणपती मंडळांवर, मुंबईतील विविध भागांमध्ये आणि विसर्जन स्थळांवर एआय कॅमेरे बसवण्यात आले आहेत. 

ADVERTISEMENT

Ganesh Festival 2025
Ganesh Festival 2025
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देशभरात गणपती बप्पांच्या आगमनाला सुरुवात

point

AI कॅमेऱ्याद्वारे सणानिमित्त भक्तांवर करडी नजर 

point

हजारो मुंबई पोलिसांची ऑन ड्युटी

Ganesh Festival : आज 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी दिवशी राज्यातच नाही,तर देशभरात गणपती बाप्पांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईसह पुणे शहरातील गणेशोत्सव सणाला कसलंही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांची करडी नजर असणार आहे. तसेच मुंबई पोलिसांनी सणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षेची तयारी केली आहे. विशेषत: नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. अनेक मोठ्या गणपती मंडळांवर, मुंबईतील विविध भागांमध्ये आणि विसर्जन स्थळांवर एआय कॅमेरे बसवण्यात आले आहेत. 

हे ही वाचा : मनोज जरांगेंनी केली गणपती बप्पांची आरती, मुंबईकडे कूच करण्याआधी फडणवीसांनी खेळली खेळी?

AI कॅमेऱ्याद्वारे गुन्हेगारांवर करडी नजर 

गणेशोत्सवादरम्यान, मुंबई पोलीस वापरत असलेले कॅमेरे भविष्यात संपूर्ण शहरात बसवण्याचं प्लॅनिंग सुरू आहे. या एआय कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुन्हेगारांवर करडी नजर राहणार आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून ऑपरेटर पोलिसांना रिअल टाइम अपडेट्स पाठवतील. 

यासाठी गर्दीच्या परिस्थितीत सुरक्षेत कोणतीही अडचण होऊ नये म्हणून भाविकांच्या हालचालींवर हे कॅमेरे लक्ष ठेवतील. मुंबईतील एकूण सुप्रसिद्ध गणपती, तसेच लालबाग परिसरातील गणपतीच्या मंडपांमध्ये आणि विसर्जन स्थळांवर सुमारे 300 एआय कॅमेरे बसवण्यात आले आहेत. 

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 10 दिवसांच्या गणेशोत्सव सणाला कसलंही गालबोट लागू नये, तसेच अनुचित प्रकार घ़डू नये यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर एकूण 17 हजार 600 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच 11 हजार  सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे गर्दीवर लक्ष ठेवले जाते.

हे वाचलं का?

    follow whatsapp