काकीच्या बेडरूममध्ये शिरला अन्... 17 वर्षीय पुतण्याने गोळी झाडून केली हत्या! नेमकं प्रकरण काय?
17 वर्षीय पुतण्याने काकीवर गोळू झाडून तिची हत्या केल्याचं वृत्त आहे. वृत्तानुसार, आरोपी तरुण घरात घुसला आणि आपल्या काकीवर अगदी जवळून गोळी झाडली. पुतण्याने केलेल्या या हल्ल्यात पीडित महिलेला जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
काकीच्या बेडरूममध्ये शिरला अन्...
17 वर्षीय पुतण्याने गोळी झाडून केली हत्या!
Crime News: उत्तर प्रदेशातील मेरठ येथून नातेसंबंधांना काळीमा फासणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. काकीसोबतच्या रोजच्या भांडणाला कंटाळून 17 वर्षीय पुतण्याने तिची गोळू झाडून हत्या केल्याचं वृत्त आहे. वृत्तानुसार, आरोपी तरुण घरात घुसला आणि आपल्या काकीवर अगदी जवळून गोळी झाडली. पुतण्याने केलेल्या या हल्ल्यात पीडित महिलेला जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर, अल्पवयीन आरोपी तरुण घटनास्थळीवरून फरार झाला. मात्र, काही वेळानंतर त्याने स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. शिवा त्यागी असं आरोपी तरुणाचं नाव समोर आलं असून पूजा त्यागी अशी मृत महिलेची ओळख आहे.
संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच, पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या घटनेनंतर, परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हस्तिनापूर परिसरातील गणेशपूर गावात ही घटना घडली असून आरोपी पुतण्याने काकीच्या खोलीत शिरून तिची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी, अल्पवयीन पुतण्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.
काकीच्या खोलीत शिरला अन् गोळी झाडून हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कुटुंबातील सदस्य आपापल्या कामात व्यस्त असताना अचानक बेडरूममधून गोळीबाराचा आवाज आला. आवाज ऐकून कुटुंबीय खोलीत धावले आणि त्यावेळी पीडित पूजा (32) रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेल्याचं आढळून आलं. तसेच, आरोपी पुतण्या हातात पिस्तूल घेऊन पळून जाताना कुटुंबियांना दिसला. त्यावेळी, गंभीररित्या जखमी झालेल्या पूजाचा काही क्षणातच जागीच मृत्यू झाला. प्रकरणाची माहिती मिळताच हस्तिनापूर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर, महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आल्याचं वृत्त आहे.
हे ही वाचा: ग्राहकांना दिलासा! युद्धाच्या भडक्यात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण... काय आहे सध्याचा दर?
दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली की हत्येनंतर आरोपीने पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. पोलिस चौकशीदरम्यान, आरोपीने सांगितलं की त्याची काकी पूजा त्याच्याशी नेहमी भांडायची असे आणि म्हणूनच तिच्या वादाला कंटाळून तरुणाने हे टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांनी आरोपीकडून हत्येत वापरलेलं बेकायदेशीर पिस्तूल आणि काडतुसे जप्त केले आहेत. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.










