वैष्णव देवी राज्यमार्गावर मोठी दुर्घटना! दरड कोसळून 34 प्रवाशांचा मृत्यू, 23 जण जखमी, नेमकं काय घडलं?

Vaishno Devi land Slide Incident :  जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कटरा येथे असलेल्या माता वैष्णव देवी यात्रा मार्गावर बुधवारी मोठी दुर्घटना घडली.

Vaishno Devi Land Slide Incident
Vaishno Devi Land Slide Incident
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वैष्णव देवी राज्यमार्गावर दरड कोसळली

point

मुसळधार पावसाने जम्मू काश्मीरला झोडपलं

point

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?

Vaishno Devi land Slide Incident :  जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कटरा येथे असलेल्या माता वैष्णव देवी यात्रा मार्गावर बुधवारी मोठी दुर्घटना घडली. या मार्गावर दरड कोसळल्याने 34 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 23 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने तेथे मलबा जमा झाला आहे. मोठ मोठे दगड गोटे खाली पडल्याने हा राज्यमार्ग बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नॉर्दर्न रेल्वेने बुधवारी 22 ट्रेन्स रद्द केल्या आणि 27 ट्रेन्स शॉर्ट-टर्मिनेट केल्या. यामध्ये वैष्णव देवी बेस कॅम्पवर चालणाऱ्या 9 ट्रेन्सचा समावेश आहे. 

PM मोदींनी ट्वीटरवर व्यक्त केलं दु:ख

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटलंय, श्री माता वैष्णव देवी मंदिर मार्गावर दरड कोसळ्याने जीवितहानी झाली, हे खूप दु:खद आहे. पीडित कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, प्रशासन सर्व लोकांना सहकार्य करण्याचं काम करत आहे. 

हे ही वाचा >> मनोज जरांगेंनी केली गणपती बप्पांची आरती, मुंबईकडे कूच करण्याआधी फडणवीसांनी खेळली खेळी?

पावसाची संततधार सुरुच असल्याने जम्मू काश्मीरमध्ये पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये पूल वाहून गेला आहे, तसच वीजेचे आणि मोबाईल टॉवरचेही मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळी 11.30 ते 5.30 वाजताच्या दरम्यान जम्मूत 6 तासांमध्ये जोरदार पाऊस बरसला. दरम्यान, मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर ओसरला, यामुळे लोकांना थोडा दिलासा मिळाला. मंगळवारपर्यंत सतत पाऊस सुरु राहिल्याने अनेक ठिकाणी पूर आला. त्यामुळे साडे तीन  हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp