गणेशोत्सवाला गालबोट! कोकणात लेकानेच आईच्या गळ्यावर धारदार शस्त्राने केले सपासप वार, नंतर स्वत:चीच नस कापली अन्

Ratnagiri Crime News : रत्नागिरी जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. लेकानेच आपल्या आईचा धारदार शस्त्राने वार करत खून केला आहे.

ratnagiri crime
ratnagiri crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रत्नागिरी जिल्ह्यात काळिज पिळवटून टाकणारी घटना

point

मुलानेच आईचा केला खून

point

स्वत:चीच कापली नस

Ratnagiri Crime News : कोकणात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. पण आता याच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील नाचणे गावात काळिज पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपी मुलाने स्वत:लाही अनेक जखमा करून घेतल्या आहेत. त्याला उपचारासाठी एका नजीकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनं नाचणे गावातील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना कधी घडली याची ठोस माहिती समोर आली नाही. पण या घटनेचा खुलासा 26 ऑगस्ट रोजी झाला. खून करण्यात आलेल्या आईचं नाव पूजा शशिकांत तेली (वय 45) असे आहे. तर  जखमी मुलाचे नाव अनिकेत शशिकांत तेली (वय 25) असे आहे. 

हे ही वाचा : विरारमध्ये जीर्ण झालेली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली आईसह लेकीचा मृतदेह, क्षणार्धात अनेक कुटुंबं हरपली

नेमकं काय घडलं?

संबंधित प्रकरणाची माहिती त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्यांना समजताच हे प्रकरण समोर आलं. त्यांनी या घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. तेव्हा घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, मुलाने धारदार शस्त्राने आईच्या गळ्यावर सपासप वार केले. यानंतर आरोपीने मुलाने आपल्या हाताची नसच कापली. 

आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता, आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मुलाला तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा : रायगड आणि रत्नागिरीत जोरदार पावसाची शक्यता, तर 'या' ठिकाणी येलो अलर्ट

या घटनेचं नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. कौटुंबिक कलहातूनच हा धक्कादायक प्रकार समोर आला असावा, असा पोलिसांचा समज आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत आणि लवकरच या घटनेची अधिक माहिती लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा आहे. गणेशोत्सवासारख्या आनंददायी सणात विरजन आलं आहे. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp