Govt Job: ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये निघाली बंपर भरती... अर्ज करण्याची शेवटची तारीख माहितीये?
‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II आणि स्केल III) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

बातम्या हायलाइट

‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये निघाली बंपर भरती

काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Govt Job: बँकिंग क्षेत्रात नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II आणि स्केल III) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 500 रिक्त पदांवर भरती केली जाईल. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 13 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून उमेदवार 30 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या या भरतीमध्ये स्केल II आणि स्केल III दोन्ही श्रेणींच्या पदांचा समावेश आहे. या भरतीअंतर्गत एकूण 500 जनरलिस्ट ऑफिसर पदांची भरती केली जाईल. ही भरती संपूर्ण देशातील उमेदवारांसाठी असून कोणत्याही राज्यातील उमेदवार यात सहभागी होऊ शकतात.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांचे वय 31 जुलै 2025 रोजी किमान 22 वर्षे आणि कमाल 35 वर्षे असावे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट दिली जाईल. एससी (SC), एसटी (ST), ओबीसी (OBC) आणि इतर पात्र उमेदवारांना याचा लाभ मिळेल.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर म्हणजेच ग्रॅज्यूएशनची पदवी असणं आवश्यक आहे. तसेच, किमान 60 टक्के गुणांसह ग्रॅज्यूएशन उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. याव्यतिरिक्त, चार्टर्ड अकाउंटंट्स देखील या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र ठरू शकतात.
‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्जाची फी देखील जमा करावी लागेल.
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना 1180 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
तसेच, एससी (SC), एसटी (ST) आणि पीडब्ल्यूडी (PwD) प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क फक्त 118 रुपये ठेवण्यात आले आहे.
महिला उमेदवारांनाही नियमांनुसार अर्जाच्या शुल्कात सूट देण्यात येईल.
हे ही वाचा: मुंबईची खबर: कबुतरांमुळे आरोग्यावर विपरित परिणाम? हायकोर्टाचा आदेश अन् राज्य सरकारकडून नवी समिती...
निवड प्रक्रिया
बँक ऑफ महाराष्ट्रने या भरतीसाठी निवड प्रक्रिया देखील निश्चित केली आहे. उमेदवारांना प्रथम ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना मुलाखत फेरीसाठी बोलावले जाईल. दोन्ही टप्प्यांमधील गुणांच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
किती मिळेल पगार?
‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये जनरलिस्ट ऑफिसर पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना चांगला पगार मिळेल. स्केल II आणि स्केल III पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 93,960 रुपये कमाल वेतन दिले जाईल. याशिवाय, इतर भत्ते आणि सुविधा देखील उपलब्ध असतील, ज्यामुळे एकूण पॅकेज आणखी मोठं होईल.
हे ही वाचा: गणेश चतुर्थी 2025: केवळ भारतातच नव्हे तर ‘या’ 4 देशांत सुद्धा धुमधडाक्यात साजरा होतो गणेशोत्सव!
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ महाराष्ट्र’च्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्यासाठी, उमेदवारांना प्रथम वेबसाइटला भेट देऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल. यानंतर, सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल आणि अर्ज शुल्क ऑनलाइन जमा करावे लागेल. अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवारांनी त्याचे प्रिंटआउट भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.