मुंबईची खबर: MHADA कोकण बोर्डाच्या लॉटरीची अंतिम तारीख वाढली... आतासुद्धा करू शकता अर्ज!
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) कोकण बोर्ड लॉटरी 2025 साठी अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे.

बातम्या हायलाइट

MHADA कोकण बोर्डाच्या लॉटरीची अंतिम तारीख वाढली

कधीपर्यंत करू शकता अर्ज?
Mumbai News: मुंबईमध्ये हक्काचं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) कोकण बोर्ड लॉटरी 2025 साठी अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे. आता नागरिक 5,285 फ्लॅट्स आणि 77 भूखंडांसाठी 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. वसई आणि ठाणे शहरात घर खरेदी करण्यासाठी ही चांगली संधी आहे. या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी 28 ऑगस्ट ही अंतिम तारीख होती. आता लॉटरीची सोडत 9 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती आहे.
5,200 हून अधिक फ्लॅट्स आणि 77 भूखंड उपलब्ध
ठाणे शहर आणि जिल्हा तसेच वसई (पालघर जिल्हा) वेगवेगळ्या गृहनिर्माण योजनांतर्गत एकूण 5,285 फ्लॅट्स आणि 77 निवासी भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आता नागरिक 12 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
9 ऑक्टोबर रोजी लॉटरीची सोडत
म्हाडा कोकण मंडळाच्या मुख्याधिकारी रेवती गायकर यांनी संगणकीकृत लॉटरी सोडत 9 ऑक्टोबर 2025 रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर सभागृहात होणार असल्याची माहिती दिली.
हे ही वाचा: Govt Job: आता एअरपोर्टवर कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा नोकरी... 'या' पदांसाठी लवकरच करा अर्ज!
अर्ज आणि पेमेंटच्या अंतिम मुदतीत बदल
सुधारित वेळापत्रकानुसार, या म्हाडाच्या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर रात्री 11:59 आहे. बयाणा रक्कम 13 सप्टेंबर रात्री 11:59 पर्यंत ऑनलाइन जमा करता येईल. पर्यायी अर्जदार 15 सप्टेंबर रात्री 11:59 पर्यंत बँकांमधून RTGS/NEFT द्वारे पेमेंट करू शकतात.
पात्रता आणि अर्जदार पडताळणी प्रक्रिया
सर्व आवश्यक डॉक्यूमेंट्स पूर्ण असणारे आणि योग्य रक्कम भरणारे अर्जदारच लॉटरीसाठी पात्र मानले जातील. पात्र अर्जदारांची प्रारूप यादी 22 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल.
हे ही वाचा: "तुझी किडनीच काढून विकेन..." कर्जावरून मित्राला बेदम मारहाण अन्... मुंबईतील धक्कादायक घटना
कधी होणार निकाल जाहीर?
अर्जदार 24 सप्टेंबर, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाइन दावे आणि हरकती सादर करू शकतील. पात्र अर्जदारांची अंतिम यादी 7 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता प्रकाशित केली जाईल तसेच यशस्वी आणि प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची नावे 9 ऑक्टोबर रोजी सोडतीच्या दिवशी वेबसाइटवर उपलब्ध होतील.