Govt Job: आता एअरपोर्टवर कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा नोकरी... 'या' पदांसाठी लवकरच करा अर्ज!

एअरपोर्ट ऑथरिटी ऑफ इंडिया (AAI) कडून जूनिअर अॅक्झिक्यूटिव्हच्या 900 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

आता एअरपोर्टवर कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा नोकरी...
आता एअरपोर्टवर कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा नोकरी...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एअरपोर्ट ऑथरिटी ऑफ इंडिया (AAI) कडून निघाली भरती

point

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा एअरपोर्टवर नोकरी

Govt Job: विमानतळावर नोकरीची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. एअरपोर्ट ऑथरिटी ऑफ इंडिया (AAI) कडून जूनिअर अॅक्झिक्यूटिव्हच्या 900 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 28 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झाली असून उमेदवार 27 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवार www.aai.aero या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. 

'एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया'च्या या भरतीद्वारे, विविध विभागांमध्ये जूनिअर अॅक्झिक्यूटिव्ह म्हणजेच कनिष्ठ अधिकाऱ्यांची पदे भरली जातील. एअरपोर्टवर नोकरी करण्याची चांगली संधी उमेदवारांना उपलब्ध झाली आहे. या भरतीची विशेष बाब म्हणजे, कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. 

पदाचं नाव   रिक्त जागा
जूनिअर अॅक्झिक्यूटिव्ह (आर्किटेक्चर)  11
जूनिअर अॅक्झिक्यूटिव्ह (इंजिनीयर सिव्हिल) 199
जूनिअर अॅक्झिक्यूटिव्ह (इंजिनीयरिंग- इलेक्ट्रिकल)  208
जूनिअर अॅक्झिक्यूटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स)  527
जूनिअर अॅक्झिक्यूटिव्ह (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी)  31
एकूण  976

वयोमर्यादा 

या भरतीसाठी उमेदवाराचं कमाल वय 27 वर्षे असणं अनिवार्य आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 27 वर्षांपेक्षा अधिक नसावं. 27 सप्टेंबर 2025 ही तारीख लक्षात घेऊन वयाची गणना केली जाणार असल्याची माहिती आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. 

हे ही वाचा: "तुझी किडनीच काढून विकेन..." कर्जावरून मित्राला बेदम मारहाण अन्... मुंबईतील धक्कादायक घटना

किती मिळेल पगार?   

या भरतीमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांना (ग्रुप B, E-1 लेव्हल) 40,000-3 टक्के ते 1,40,000 रुपये इतका पगार देण्यात येईल. याव्यतिरिक्त, इतर सरकारी भत्ते देखील उमेदवारांना देण्यात येतील. 

निवड प्रक्रिया 

या भरतीमध्ये GATE 2023/ GATE 2024/ GATE 2025 परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवारच नियुक्तीसाठी पात्र ठरतील. याच आधारे, उमेदवारांची मेरिट लिस्ट तयार केली जाईल. 

हे ही वाचा: 10 वर्षीय मुलीवर बलात्कार अन् निर्घृणपणे हत्या! नंतर सापडला झाडाला लटकलेला मृतदेह... घडलं भयानक

कसा कराल अर्ज?   

1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम www.aai.aero या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
2. होमपेजवरील करिअर सेक्शनमध्ये जाऊन भरतीच्या संबंधित Apply Online या लिंकवर क्लिक करा. 
3. त्यानंतर, ईमेल आईडी आणि मोबाइल नंबर अशी आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करा. 
4. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर नोंदणीकृत मोबाइल नंबरच्या आधारे योग्य शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती भरून अर्ज करा. 
5. अर्ज भरल्यानंतर महत्त्वपूर्ण सर्टिफिकेट, पासपोर्ट साइझ फोटो, आणि सही अपलोज करा. 
6. त्यानंतर GATE रजिस्ट्रेशन नंबरची देखील माहिती भरा. 
सर्व माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर, अर्जाचं शुल्क भरा आणि फॉर्मची प्रिंटआउट काढा.

या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp