10 वर्षीय मुलीवर बलात्कार अन् निर्घृणपणे हत्या! नंतर सापडला झाडाला लटकलेला मृतदेह... घडलं भयानक
बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील मनेर गावाची दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 10 वर्षीय मुलीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

बातम्या हायलाइट

10 वर्षीय मुलीवर बलात्कार अन् निर्घृणपणे हत्या

सापडला झाडाला लटकलेला मृतदेह...
Rape and Murder case: बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील मनेर गावाची दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 10 वर्षीय मुलीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरोपींनी मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह एका निर्जन बागेतील झाडाला लटकवल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस घटनास्थळी पोहचून प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी गुरुवारी मनेर-दानापूर मार्गावरील आझादनगरजवळ रस्ता रोखून जाळपोळ केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
26 ऑगस्टपासून पीडिता बेपत्ता
पीडित मुलगी ही मनेरमधील एका गावातील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित अल्पवयीन मुलगी 26 ऑगस्टपासून तिच्या घरातून बेपत्ता होती. मुलीच्या घरच्यांनी सांगितलं, की 26 ऑगस्ट रोजी मुलगी बागेत लाकूड आणायला गेली होती आणि त्यानंतर ती घरी परतलीच नाही. संबंधित मुलीचे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता, त्यांना ओरडून हाकलून देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी मच्छीमार मासे पकडण्यासाठी आले असता त्यांना झाडाला लटकलेला मुलीच मृतदेह आढळला.
हे ही वाचा: ''पप्पांनीच मम्मीला...'' पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय अन् जिवंतच जाळलं... 7 वर्षांच्या मुलीने आणलं उघडकीस...
बलात्कार करून नंतर निर्घृण हत्या...
प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि घटनेचा तपास सुरू केला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह झाडाला लटकवण्यात आला. तसेच, मृत तरुणीची ओळख पटली असल्याची माहिती आहे. नशेत धुंद असलेल्या तरुणांनी मुलीवर बलात्कार करून नंतर तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. एफएसएल टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा करून ते तपासासाठी पाठवले आहेत. तसेच, संबंधित बागेच्या मालकाने गोपनीय पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावले असून पोलिसांनी त्या घटनेचं फुटेज ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: MOTN Survey : आताच्या घडीला निवडणुका झाल्या, तर NDA जिंकणार 324 जागा..BJP ला बहुमत मिळणार नाही, कारण..
पोलिसांनी दिली माहिती
पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीच्या नातेवाईकांनी पीडिता बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवल्यानंतर त्याच रात्री पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरूवात केली होती. तसेच, मृत पावलेल्या मुलीच्या आईचा 4 वर्षांपूर्वी गंभीर आजारामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुलीचे वडील मजूरीचं काम करत असून गावकऱ्यांनी तातडीने गुन्हेगारांचा शोध घेण्याची मागणी पोलिसांकडे केली. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.