पत्नीचं अफेअर असल्याचा संशय आला..पतीने पत्नीला रुममध्ये जीवंत जाळलं! 7 वर्षांच्या मुलीनं पोलिसांना सगळंच सांगितलं
Navi Mumbai Shocking Murder Case : नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून त्याच्या 32 वर्षांच्या पत्नीला जीवंत जाळलं.

बातम्या हायलाइट

नवी मुंबईक घडली भयंकर घटना

पतीने पत्नीला जीवतं जाळलं आणि..

पोलीस तपासात समोर आली धक्कादायक बातमी
Navi Mumbai Shocking Murder Case : नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून त्याच्या 32 वर्षांच्या पत्नीला जीवंत जाळलं. त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी त्याच्या 7 वर्षांच्या मुलीनं पोलिसांना या घटनेची माहिती दिली, तेव्हा पतीचा पर्दाफाश झाला. वडिलांनीच आईची हत्या केली, असं त्यांच्या मुलीनं पोलिसांना सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 25 ऑगस्ट रोजी उरण परिसरात पगोटेगावात घडली. 35 वर्षांच्या आरोपीला हत्येच्या पुढच्याच दिवशी अटक करण्यात आली. उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांनी पीटीआयला सांगितलं की, आरोपी राजकुमार साहूला त्याची पत्नी जगरानी राजकुमार साहूच्या अफेअरबाबत संशय होता. त्यामुळे आरोपीने त्याच्या पत्नीचे हात-पाय बांधले आणि त्यावर तेल टाकून तीला जाळून टाकलं.
हे ही वाचा >> विरारमध्ये जीर्ण झालेली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली आईसह लेकीचा मृतदेह, क्षणार्धात अनेक कुटुंबं हरपली
सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद, पण नंतर सत्य आलं समोर
पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं, जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आरोपीने दावा केला होता की, त्याच्या पत्नीने घरातील एका रुममध्ये स्वत:ला बंद केलं आणि आत्महत्या केली. त्यामुळे सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पण आमच्या तपासात वेगळं सत्य बाहेर आलं.
पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि दाम्पत्याच्या सात वर्षांच्या मुलीच्या जबाबवरून हत्येची घटना असल्याचं समोर आलं. आरोपीने दावा केला होता की, त्याच्या पत्नीने रुममध्ये स्वत:ला संपवलं. पण मुलीचं जबाब समोर आल्यावर सत्य समोर आलं. सीसीटीव्ही फुटेजमध्येही दिसत होतं की, घटना घडल्यानंतर आरोपी घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, उरण पोलिसांनी आरोपी विरोधात कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा >> गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था! 17,000 हून अधिक पोलीस तैनात...