MOTN Survey : आताच्या घडीला निवडणुका झाल्या, तर NDA जिंकणार 324 जागा..BJP ला बहुमत मिळणार नाही, कारण..
MOTN Survey 2025 : देशात जर आताच्या घडीला निवडणुका झाल्या, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या जागा वाढून 324 पर्यंत पोहोचतील.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आताच्या घडीला निवडणुका झाल्या, तर भाजपला बहुमत मिळणार नाही

MOTN सर्व्हेत समोर आली धक्कादायक माहिती

आताच्या घडीला निवडणुका झाल्या तर कोणाला किती जागा?
MOTN Survey 2025 : देशात जर आताच्या घडीला निवडणुका झाल्या, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या जागा वाढून 324 पर्यंत पोहोचतील. तसच भाजपच्या जागाही 240 वरून 260 इतक्या होतील. परंतु, भाजपा बहुमताचा आकडा 272 च्या मागेच राहील. इंडिया टुडे आणि सी-व्होटर 'मूड ऑफ द नेशन'सर्व्हेच्या माध्यमातून असा रिझल्ट समोर आला आहे.
हा सर्व्हे देशातील सर्व राज्यांमध्ये आणि लोकसभा विभागात 1 जुलैपासून 15 ऑगस्ट 2025 दरम्यान घेण्यात आला. प्रत्येक वयोगटातील, जाती-धर्मातील 54 हजार 788 लोक यामध्ये सामील होते. याशिवाय 24 आठवड्यात 1 लाख 52 हजार 38 लोकांचंही मत घेण्यात आलं होतं. त्यांच्या विश्लेषणाचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. अशाप्रकारे एकूण 2 लाख 6 हजार 826 लोकांचं मतप्रदर्शन मूड ऑफ द नेशनच्या माध्यमातून समोर आलं आहे.
जर आज लोकसभा निवडणुका झाल्या, तर त्याचा परिणाम काय होणार? कोणत्या युतीला किती जागा मिळतील? असे प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर सर्वेच्या माध्यमातून माहिती समोर आली की, एनडीएला 324 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर INDIA आघाडीला 208 जागा मिळू शकतात.
तर अन्य पक्षांच्या खात्यात 11 जागा जाऊ शकतात. दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 293 जागा मिळाल्या होत्या. तर इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या होत्या. फेब्रुवारी 2025 मध्ये सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये एनडीएला 343 जागा आणि इंडिया आघाडीला 188 जागा मिळण्याची शक्यता होती.