Maharashtra Weather : होळी सणानंतर राज्यातील 'या' तीन जिल्ह्यात आग ओकणारं संकट

मुंबई तक

Maharashtra Weather : होळी सणानंतर आता राज्यात हवामानात मोठे बदल जाणवताना दिसत आहेत. तापमानाचा पारा आता चांगला चढला आहे. 5 मार्च रोजी कोकणातील पालघर,रायगड आणि ठाणे जिल्ह्यात हवामान उष्ण आणि आद्र हवामानाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला. जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोकणात वारं फिरल्याचं चित्र

point

मध्य महाराष्ट्रात उष्णतेचं सावट 

Maharashtra Weather : होळी सणानंतर आता राज्यात हवामानात मोठे बदल जाणवताना दिसत आहेत. तापमानाचा पारा आता चांगला चढला आहे. 5 मार्च रोजी कोकणातील पालघर,रायगड आणि ठाणे जिल्ह्यात हवामान उष्ण आणि आद्र हवामानाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला. जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

हे ही वाचा : सासऱ्याची लेकीसारख्या सुनेवर वाईट नजर, महिलेच्या कंबरेला चुकीचा स्पर्श... पीडितेनं घरात लावले सीसीटीव्ही

कोकणात वारं फिरल्याचं चित्र

कोकणात वारं फिरल्याचं चित्र असून हवामान मुख्यत्वे कोरडं, उष्ण आणि उष्ण आद्रता जाणवेल. उत्तर कोकणात पारा चांगलाच चढला आहे. तसेच रायगड आणि पालघर जिल्ह्यांना उष्ण-आद्र हवामानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मध्य महाराष्ट्रात उष्णतेचं सावट 

मध्य महाराष्ट्रात देखील उष्णतेचं सावट असणार आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत तापमानाचा पारा वाढणार आहे. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही अंश प्रमाणात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच तपमान हे सामान्यापेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा विभाग : 

मराठवाडा विभागात काही ठिकाणी कोरडं आणि उष्ण हवामान  विभागाचा अंदाज राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरासह जालना, परभणी आणि नांदेड परिसरात तापमानात मोठी वाढ झाली आहे. 5 मार्चला कोणताही विशेष अलर्ट नाही, पण उन्हाची तीव्रता वाढणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp