Emergency Alert on phone: एकाच वेळी संपूर्ण भारतातील मोबाइल फोनवर का वाजले सायरन? 'तो' मेसेज नेमका काय?

मुंबई तक

भारतातील लाखो मोबाईल फोनवर शनिवारी (2 मे) काही सेकंदांसाठी इमर्जन्सी अलर्ट आला. केंद्र सरकारच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन इशारा प्रणालीची चाचणी घेण्यासाठी हे विशेष पाऊल उचलण्यात आले होते.

ADVERTISEMENT

Emergency Alert on phone
Emergency Alert on phone
google news

बातम्या हायलाइट

point

एकाच वेळी संपूर्ण भारतातील मोबाइल फोनवर का वाजले सायरन?

point

'तो' मेसेज नेमका काय?

Emergency Alert on phone: भारतातील लाखो मोबाईल फोनवर शनिवारी (2 मे) काही सेकंदांसाठी इमर्जन्सी अलर्ट आला. केंद्र सरकारच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन इशारा प्रणालीची चाचणी घेण्यासाठी हे विशेष पाऊल उचलण्यात आले होते. या संदर्भात दूरसंचार विभागाने (DoT) बुधवारीच नागरिकांना पूर्वसूचना दिली होती आणि अशा चाचणी संदेशांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले होते. ही प्रक्रिया देशातील आपत्कालीन संदेश वहन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी राबवली जात आहे.

'कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल'

दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्या संयुक्त विद्यमाने ही अत्याधुनिक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. 'कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल' (CAP) या संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाने शिफारस केलेल्या मानकांवर ही यंत्रणा आधारित आहे. सध्या ही प्रणाली भारतातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यान्वित असून, याद्वारे भौगोलिक सीमांनुसार त्या-त्या भागातील नागरिकांना आपत्तीची माहिती एसएमएसद्वारे दिली जाते.

हे ही वाचा : 'गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायचा नाही..सहन करायचं..' भोर अत्याचार प्रकरणावरुन सुषमा अंधारे संतापल्या

सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञानाचा समावेश

आपत्तीच्या वेळी संदेश पोहोचवण्याचा वेग वाढवण्यासाठी आता एसएमएसच्या जोडीला 'सेल ब्रॉडकास्ट' (CB) तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे एकाच वेळी एका ठराविक भौगोलिक क्षेत्रातील सर्व मोबाईल उपकरणांना तात्काळ संदेश पाठवता येतो. यामुळे आपत्कालीन स्थितीत कोणतीही विलंब न होता नागरिकांना सतर्क करणे शक्य होणार असून, ही यंत्रणा अत्यंत विश्वासार्ह मानली जात आहे.

हे ही वाचा : उल्हासनगर : प्रेमप्रकरणावरुन रक्तरंजित राडा, चहा पित असतानाच तरुणाच्या छातीत भोसकला चाकू

नैसर्गिक आपत्तीपासून वाचण्यासाठी

सध्या या सेल ब्रॉडकास्ट सुविधेची देशव्यापी चाचणी सुरू असून, यंत्रणेच्या कामगिरीचे आणि अचूकतेचे मूल्यमापन केले जात आहे. या चाचणी कालावधीत नागरिकांना इंग्रजी, हिंदी आणि विविध प्रादेशिक भाषांमध्ये संदेश प्राप्त होऊ शकतात. ही सर्व प्रक्रिया औपचारिक उद्घाटनापूर्वीची तयारी असून, भविष्यात नैसर्गिक आपत्ती किंवा इतर आणीबाणीच्या काळात जनसामान्यांचे जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी ही प्रणाली मैलाचा दगड ठरणार आहे.
 

हे वाचलं का?