कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस घालणार थैमान, 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नुसार 29 ऑगस्ट रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

बातम्या हायलाइट

भारतीय हवामान विभागाचा अंदाज

राज्यातील हवामानाची महत्त्वाची अपडेट
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नुसार 29 ऑगस्ट रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : मराठा आंदोलकांवर दु:खांचं सावट! जरांगेंच्या कट्टर समर्थकाचा मृत्यू, 'त्या' ठिकाणी घडलं तरी काय?
कोकण विभाग :
राज्यातील कोकण भागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. 40-50 किमी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाट पाऊस थैमान घालेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर इतर काही भागांमध्ये यलो अलर् जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा :
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि नांदेड या ठिकाणी मध्यम ते जोराचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
हे ही वाचा : बीड जिल्ह्यात टोळक्यांनी आईसह लेकीवर लोखंडी पाईप अन् रॉडनं केला हल्ला, जनावरासारखं काळं निळं होईपर्यंत मारलं
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र :
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा या ठिकाणी मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. तर याच भागात हवामान विभागाने पावसाचा यलो आणि काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगाव या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची हवामान विभागाने शक्यता जारी केली आहे.