“पिंक गँग” 16 मुली आणि फिक्स टार्गेट... फक्त एक कॉल अन् लोक स्वतः करायचे पैसे ट्रान्सफर!

‘पिंक गँग’ ही एक अशी टोळी आहे जी 16 मुलींनी एकत्र चालवली आहे. या मुली ग्राहकांना फोन करून असं काही बोलायच्या की लोक काहीही विचार न करता त्यांना पैसे ट्रान्सफर करायचे.

“पिंक गँग” 16 मुली आणि फिक्स टार्गेट...
“पिंक गँग” 16 मुली आणि फिक्स टार्गेट...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

16 मुली आणि फिक्स टार्गेट...

point

फक्त एक कॉल अन् लोक करायचे पैसे ट्रान्सफर!

Crime News: ‘पिंक गँग’, नाव ऐकून तर नक्कीच समजलं असेल की ही एक मुलींची टोळी आहे. ही एक अशी टोळी आहे जी 16 मुलींनी एकत्र चालवली आहे. या मुली ग्राहकांना फोन करून असं काही बोलायच्या की लोक काहीही विचार न करता त्यांना पैसे ट्रान्सफर करायचे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.

नोकरी देण्याचं आमिष 

खरंतर, मंगळवारी (26 ऑगस्ट) पोलिसांनी पश्चिम उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील एका कॉल सेंटरमधून 16 मुलींना अटक केली. या मुली बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचं आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालत होत्या. पोलिसांना या कॉल सेंटरची माहिती आपत्कालीन क्रमांकावर मिळाली, त्यानंतर येथे छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. मुलींसह, या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन पुरुषांनाही अटक करण्यात आली आहे.

लाखो रुपयांना गंडा 

या दोन्ही पुरुषांची ओळख अहद आणि जुबैद अशी झाली आहे. ही दोन्ही मुले या टोळीचे सूत्रधार होते. हे लोक बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याच्या नावाखाली फसवण्यासाठी अगदी कमी पगारावर मुलींना कामावर ठेवायचे. या मुलींचे काम बेरोजगार तरुणांना कॉल करणं आणि त्यांना मोठ्या पगाराच्या पॅकेजसह नोकरीचं आमिष दाखवून अडकवणं, असं होतं. पोलिसांच्या छाप्यादरम्यान, अशा 16 मुलींना घटनास्थळावरून अटक करण्यात आली.

हे ही वाचा: पत्नीला इंस्टाग्रामचं वेड! कधी पेट्रोल अन् चाकू घेऊन आत्महत्येचा प्रयत्न तर कधी दुसऱ्याच पुरुषासोबत.... नेमकं प्रकरण काय?

2500 ते 5000 रुपये वसूल... 

बेरोजगार तरुणांचे नंबर मिळवल्यानंतर, त्यांना आधी फोनवरून आकर्षक नोकऱ्यांचं आमिष दाखवलं जात होतं आणि नंतर सिक्योरिटी मनी म्हणजेच आगाऊ रक्कम मागितली जात होती. सहसा पीडित तरुणांकडून 2500 ते 5000 रुपये वसूल केले जात होते.

अधिकाऱ्यांनी दिली माहिती... 

मुझफ्फरनगरचे एसपी या प्रकरणासंदर्भात म्हणाले की, या कॉल सेंटरबाबत 1930 हेल्पलाइनवर तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर एक पथक तयार करून घटनास्थळी छापा टाकण्यात आला. त्यानंतर घटनास्थळावरून तीन लॅपटॉप, 20 मोबाईल फोन आणि सुमारे 30 सिम कार्ड जप्त करण्यात आले. बरीच महत्त्वाची कागदपत्रे आणि रजिस्टर देखील सापडले, ज्यामध्ये पीडितांची माहिती नोंदवण्यात आली होती.

हे ही वाचा: मराठा आंदोलकांवर दु:खांचं सावट! जरांगेंच्या कट्टर समर्थकाचा मृत्यू, 'त्या' ठिकाणी घडलं तरी काय?

पोलिसांच्या चौकशीदरम्यान, हे कॉल सेंटर विशेषतः पुणे आणि महाराष्ट्रातील इतर भागातील तरुणांना लक्ष्य करत असल्याचं समोर आलं आहे. दरमहा 30 ते 40 हजार कॉल केले जात होते. प्राथमिक अंदाजानुसार, हजारो बेरोजगार तरुण या जाळ्यात अडकले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पकडलेल्या दोन्ही आरोपींची तीन बँक खाती शोधून काढली असून घटनेचा खुलासा झाल्यानंतर, ही खाती फ्रीझ प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp