'सरकार आरक्षण देत नाही...' शेतकऱ्याची रस्त्यावर गळफास घेत टोकाची भूमिका, सुसाईड नोटची गावभर चर्चा?

Maharashtra Farmer Suicide : फुलांब्री तालुक्यातील एका शेतकरी तरुणाने आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली. ही घटना 29 रोजी टाकळी कोलते येथे घडली आहे. या घटनेनं एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

maharashtra farmer suicide

maharashtra farmer suicide

मुंबई तक

29 Aug 2025 (अपडेटेड: 29 Aug 2025, 11:13 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शेतकरी तरुणाची आत्महत्या

point

आंदोलना व्हायचं होतं सामिल

point

आत्महत्येचं धक्कादायक कारण समोर

Maharashtra Farmer Suicide : फुलांब्री तालुक्यातील एका शेतकरी तरुणाने आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली. ही घटना 29 रोजी टाकळी कोलते येथे घडली आहे. या घटनेनं एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. गोपीनाथ कोलते यांनं आत्महत्या केल्याचं कारण आता समोर आलं आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यानं आत्महत्या केली आहे. हताश होऊन त्याने धानोरा परिसरात रस्त्यावर गळफास घेत टोकाचं पाऊल उचललं. तर गावातील काही लोकांनी सरकार आरक्षण देत नसल्यानं आत्महत्या करतोय, असे सुसाई़ नोटमध्ये लिहिल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. पण ठोस माहिती समोर आली नाही. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अखेर मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानावर धडकले, कसं पाटील म्हणतील तसं

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

ते आपल्या कुटुंबासह टाकळी कोलते येथील गोपीनाथ तेजराव कोलते राहत होते. शेतजमीन ही वडिलांच्या नावे असून तीन हप्ते फेडणं राहून गेलं. यातूनच तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सावकराकडून कर्ज देखील घेतलं होतं. त्यातूनच तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली.

त्यानंतर त्यांना एका रुग्णालयात आणण्यात आलं आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आणि त्यानंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. या घटनेनं टाकळी कोलते येथे शोकाकुल वातावरण आहे.

हे ही वाचा : बुधादित्य योग निर्माण होतोय, 'या' राशीतील लोकांना पैशाची कसलीच कमी भासणार नाही, काय सांगतं राशीभविष्य?

आरक्षण न दिल्याने आत्महत्या...? 

गोपीनाथ कोलते या मराठा बांधवाला आंदोलनात सहभागी व्हायचे होते. मात्र, सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही म्हणून मी आत्महत्या करतोय, अशी सुसाईड नोट सापडल्याची तालुक्यात चर्चा आहे. पण, यावर अद्यापही ठोस बातमी समोर आली नाही.

    follow whatsapp