Today Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या बदायूंच्या इस्लामनगर परिसरात एका तरुणाने राहत्या घरी गळफास लावून स्वत:चं जीवन संपवलं. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत घटनेचा तपास सुरु केला. तरुणाच्या मृत्यमुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचं डोंगर कोसळलं. फॉरेन्सिक टीमने या घटनेसंबंधीत पुरावे गोळा केले आहेत. तरुण गुरुग्रामहून पत्नीला समजवण्यासाठी आला होता. तरुणाच्या भावाने सांगितलं की, वहिनीला रील बनवण्याचं वेड लागलं होतं. त्यामुळे हे सर्व थांबवण्यासाठी भाऊ तिला समजवायला आला होता. पण पत्नीने न ऐकल्याने त्याने आत्महत्या केली.
ADVERTISEMENT
त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?
ही धक्कादायक घटना कस्बा इस्लामनगर परिसरात काजी टोला येथे घडली. येथे राहणारा 35 वर्षीय सुनील कुमार पुत्र जगदीशने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळताच, कुटुंबीय घरी पोहोचले. त्यानंतर त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला.
हे ही वाचा >> मित्राच्या पत्नीला मनालीला फिरायला नेलं..पतीला समजताच सर्वांसमोर केला फायरिंग अन् घडलं..हादरंवून टाकणारी घटना!
सुनील कुमारचं लग्न 14 वर्षांपूर्वी वजीरगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुसगाव येथे राहणाऱ्या तरुणीसोबत झालं होतं. सुनीलच्या पश्चात तीन मुलं आहेत. सुनीलने आत्महत्या केल्याने पत्नीलाही मोठा धक्का बसलाय. पोस्टमार्टम रिपोर्ट आणि तपास केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
मृताच्या भावाने म्हटलं की, त्याचा भाऊ गुरुग्रामहून घरी आला होता. वहिनी घाणेरडे व्हिडीओ बनवायची. भाऊने तिच्या अशा कृत्याला विरोध केला होता, पण तिने त्याचं ऐकलं नाही. त्यानंतर ती गायब झाली आणि भाऊने गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. मृताच्या भावाने म्हटलं की, वहिनी अन्य पुरुषासोबत व्हिडीओ बनवायची. दरम्यान, याप्रकरणी आरोपांची पुष्टी झालेली नाही. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा >> आधी तरुणीला बंदी बनवलं, नंतर सहा महिने आळीपाळीने केलं लैंगिक शोषण, प्रकरण आईला समजताच...
ADVERTISEMENT
