ADVERTISEMENT
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या IMD नुसार 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात विविध भागांमध्ये हवामानात बदल निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळतील असा हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे.
हे ही वाचा : परभणी हादरली! नवऱ्याने बायकोचा स्टेट्स ठेवत लिहिलं भावपूर्ण श्रद्धांजली, नंतर बारा वेळा चेहऱ्यावर अन् पोटावर गेले वार
कोकण :
कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गात सकाळपासून ढगाळ वातावरण रहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी दुपारनंतर मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर हवामान विभागाने मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे आता हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद होणार आहे. तसेच पुण्यात 30.8 अंश सेल्सिअस तपमानाची शक्यता वर्तवली आहे.
कोकण आणि मराठवाड्यातील मान्सून स्थिती :
मराठवाड्यातील जालना, लातूर या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद होणार आहे. तर विदर्भातील नागपूर, चंद्रपूरसारख्या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. नागपूरात सरासरी 1205 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात 28.5 अंश सेल्सिअस तापमानाची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.
हे ही वाचा : सरकारी निवासी शाळेत विद्यार्थिनीनं प्रसाधनगृहात बाळाला दिला जन्म, नेमकं काय घडलं?
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 24 तासांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
