परभणी हादरली! नवऱ्याने बायकोचा स्टेट्स ठेवत लिहिलं भावपूर्ण श्रद्धांजली, नंतर बारा वेळा चेहऱ्यावर अन् पोटावर गेले वार
Parbhani Crime : नवऱ्याने पत्नीच्या फोटोसह स्टेट्स ठेवला आणि भावपूर्ण श्रद्धांजली असं त्याला कॅप्शन दिलं. त्यानंतर पत्नीचा खून केल्याची दुर्देवी घटना समोर आली

बातम्या हायलाइट

जिंतूर तालुक्यात धक्कादायक प्रकरण

पतीकड़ून पत्नीचा खून
Parbhani Crime : परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. नवऱ्याने पत्नीच्या फोटोसह स्टेट्स ठेवला आणि भावपूर्ण श्रद्धांजली असं त्याला कॅप्शन दिलं आणि त्यानंतर त्यानंतर पत्नीचा खून केल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. या घटनेनं परभणी जिल्हा हादरून गेला आहे. विद्या विजय राठोड (वय 32) असे खून करण्यात आलेल्या पत्नीचं नाव आहे. तर आरोपी पतीचं नाव विजय राठोड असे आहे.
हे ही वाचा : 'आता पाटील म्हणतील तसं..', अखेर मनोज जरांगे आझाद मैदानावर धडकले, मराठा आंदोलकांचा मुंबईत एल्गार
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूर तालुक्यातील सोनारपाडा येथील तांडा शेत शिवारात गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पती विजय राठेडने हत्याराने पत्नीच्या छातीवर आणि पोटावर एक दोन नाही,तर तब्बल 12 वेळा वार करत तिचा खून केला. यात निष्पाप पत्नीचा मृत्यू झाला.
महिलेचा मृतदेह जिंतूर येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आला होता. डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. दरम्यान, महिलेला तिच्या पतीपासून दोन अपत्य असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण सध्या आरोपी हा फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शाद्बिक चकमक अन् थेट बारा वार
दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. पतीच्या जाचाला कंटाळून पत्नी विद्या नेहमी माहेरी जायची. गुरूवारी 28 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता विद्या आपल्या वडिलांच्या शेतात पोहोचली. तिथे दोघांमध्ये शाद्बिक चकमक झाली होती. याच वादातून पती विजयने पत्नीच्या छातीवर आणि पोटावर वार केलेत.
हे ही वाचा : सरकारी निवासी शाळेत विद्यार्थिनीनं प्रसाधनगृहात बाळाला दिला जन्म, नेमकं काय घडलं?
सध्या पती-पत्नींमध्ये मोठ्या प्रमाणात वादाचं प्रमाण वाढू लागलेलं आहे. दोघांतील सामज्यसपणा हल्ला कमी होऊ लागला आहे. याचमुळे हल्ली घटस्फोटाच्या प्रमाणात वाढंही होऊ लागली आहे. यामुळे हल्ला पती पत्नीचा संसार अधिककाळ टिकून राहत नाही.