Govt Job: ऑइल इंडिया लिमिटेड (OIL) कडून तरुणांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. कंपनीने ग्रेड A, ग्रेड B आणि ग्रेड C मध्ये 100 हून अधिक पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार OIL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
या भरतीमध्ये एकूण 102 रिक्त पदांचा समावेश आहे. यामध्ये अधीक्षक अभियंता (सुपरिटेंडेंट इंजीनियर) ची 3 पदे, वरिष्ठ अधिकाऱ्याची 97 पदे, गोपनीय सचिव (कॉन्फिडेंशियल सेक्रेटरी) चं 1 पद आणि हिंदी अधिकाऱ्याच्या 1 पदाचा समाविष्ट आहे.
संबंधित पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांकडे अभियांत्रिकी (इंजीनियरिंग), वित्त (फायनान्स), एचआर, आयटी, कायदा (लॉ) किंवा जिओलॉजी विषयात पदवी/ पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. तसेच, काही पदांसाठी आयसीएआय, आयसीएसआय, एमबीए किंवा पीजीडीएम सारख्या प्रोफेशनल डिग्री अनिवार्य आहे.
वयोमर्यादा
ग्रेड C साठी कमाल 37 वर्षे, ग्रेड B साठी 34 वर्षे आणि ग्रेड A साठी 42 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे, अपंग उमेदवारांना 10 वर्षे आणि माजी सैनिकांना 5 वर्षे उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
हे ही वाचा: लग्नानंतर 6 महिने नव्हते शारीरिक संबंध! तरीही राहिली गरोदर, पती संतापला अन्... प्रेमविवाह होऊन सुद्धा काय घडलं?
प्रवर्गानुसार अर्जाचं शुल्क
प्रवर्गानुसार, अर्जाचं शुल्क देखील निश्चित करण्यात आलं आहे. सामान्य आणि ओबीसी (नॉन क्रीमी लियर) प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये आणि जीएसटी शुल्क भरावं लागेल. तसेच, एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी, ईडब्ल्यूएस आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे.
किती मिळेल वेतन
ग्रेड A पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 50 हजार ते 1.6 लाख रुपयांपर्यंत वेतन मिळेल. तसेच, ग्रेड B पदांवर नियुक्त झालेल्या उमेदवारांना 60 हजार ते 1.8 लाख रुपये आणि ग्रेड C पदांवरील उमेदवारांना 80 हजार 2.2 रुपयांपर्यंत निश्चित वेतन देण्यात येईल. याव्यतिरिक्त, इतर सरकारी भत्ते आणि सुविधा देखील कर्मचाऱ्यांना मिळतील.
हे ही वाचा: गर्लफ्रेंड म्हणाली, "माझ्याशी बोलूच नकोस..." बॉयफ्रेंड संतापला अन् थेट कॉलेजसमोर जाऊन... नेमकं काय घडलं?
या भरतीअंतर्गत दोन टप्प्यांत उमेदवारांची निवड केली जाईल...
1. कंप्यूटर आधारित परीक्षा (CBT)
2. मुलाखत (इंटरव्ह्यू)
ADVERTISEMENT
