Video : अंद्धश्रद्धेतून क्रूरतेचा कळस! एकाच कुटुंबातील ७ जणांना हातपाय बांधून बेदम मारहाण

मुंबई तक

• 01:06 PM • 23 Aug 2021

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या विचारांचा जागर महाराष्ट्र होत असताना राज्याच्या सीमेवर असलेल्या चंद्रपुरात धक्कादायक प्रकार घडला. चंद्रपुरात जादूटोणा केल्याच्या संशयातून एका कुटुंबातील सात जणांना भरचौकात हातपाय बांधून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. वणी गावातील ग्रामस्थांनी हे कृत्य केलं आहे. राज्यात अंद्धश्रद्धेला प्रतिबंध घालण्यासाठी जादूटोणा कायदा लागू केलेला आहे. मात्र, असं असतानाही अंद्धश्रद्धेतून काही भयंकर […]

Mumbaitak
follow google news

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या विचारांचा जागर महाराष्ट्र होत असताना राज्याच्या सीमेवर असलेल्या चंद्रपुरात धक्कादायक प्रकार घडला. चंद्रपुरात जादूटोणा केल्याच्या संशयातून एका कुटुंबातील सात जणांना भरचौकात हातपाय बांधून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. वणी गावातील ग्रामस्थांनी हे कृत्य केलं आहे.

हे वाचलं का?

राज्यात अंद्धश्रद्धेला प्रतिबंध घालण्यासाठी जादूटोणा कायदा लागू केलेला आहे. मात्र, असं असतानाही अंद्धश्रद्धेतून काही भयंकर घटना घडत असून, असाच एक प्रकार महाराष्ट्र तेलंगाना सीमेवरील जिवती तालुक्यात घटला आहे. जादुटोणा केल्याच्या संशयातून एकाच कुटुंबातील सात जणांना मारहाण करण्यात आली. वृद्ध महिलासह कुटुंबातील सात जणांना मारहाण करतानाच व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वणी खुर्द या गावात जादूटोणा केल्याच्या संशयातून ही घटना घडली. संपूर्ण गावकऱ्यांनी मिळून आपल्याच गावातील मागास जातीतील एकाच कुटुंबातील सात जणांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली. ही घटना शनिवारी घडली.

या मारहाणीत सात जण जखमी झाले असून, गंभीर जखमी झालेल्या पाच जणांना चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी घटनेविषयी प्रचंड गोपनीयता बाळगली जात आहे.

गावाच्याबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. कुणालाही गावात प्रवेश दिला जात नसून, या प्रकरणाबाबत पोलीस अतिशय गोपनीयता बाळगत असल्याचे दिसून येते आहे.

वृद्ध महिला, लहान बाळ कुणाचाही विचार न करता बेदम मारहाण करण्यात आलेली असून, सध्या शांतता आहे. गावात कुणालाही जाऊ दिले जात नसल्यानं या प्रकरणाबाबत अधिकची माहिती मिळू शकली नाही. मात्र मारहाण झालेल्या कुटुंबातील इतर सदस्यांना गाव सोडावे लागले आहे.

    follow whatsapp