Sachin Vaze चा NIA कोर्टात जामिनासाठी अर्ज

मुंबई तक

• 04:43 AM • 17 Jul 2021

मनसुख हिरेन हत्या आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या गाडीप्रकरणात सहभागाबद्दल NIA च्या कस्टडीत असलेल्या सचिन वाझेने जामिनासाठी अर्ज केला आहे. मुंबई पोलिसांमधून निलंबीत करण्यात आलेल्या सचिन वाझेचा मनसुख हिरेन आणि अँटेलिया प्रकरणात सहभाग असल्याचे पुरावे NIA ला मिळाले आहेत. परंतू आपल्याला अटक केल्यानंतर ९० दिवस उलटूनही NIA ने चार्जशीट दाखल केलेली नसल्यामुळे सचिन […]

Mumbaitak
follow google news

मनसुख हिरेन हत्या आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या गाडीप्रकरणात सहभागाबद्दल NIA च्या कस्टडीत असलेल्या सचिन वाझेने जामिनासाठी अर्ज केला आहे. मुंबई पोलिसांमधून निलंबीत करण्यात आलेल्या सचिन वाझेचा मनसुख हिरेन आणि अँटेलिया प्रकरणात सहभाग असल्याचे पुरावे NIA ला मिळाले आहेत.

हे वाचलं का?

परंतू आपल्याला अटक केल्यानंतर ९० दिवस उलटूनही NIA ने चार्जशीट दाखल केलेली नसल्यामुळे सचिन वाझेने कोर्टात धाव घेतली आहे. ANI वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.

सचिन वाझे सध्या तळोजा येथील कारागृहात कैद आहे. सचिन वाझेसोबत काम करणारे CIU युनिटमधील तत्कालीन कर्मचारीही NIA च्या कस्टडीत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. या प्रकरणात ईडीनेही सचिन वाझेची तळोजा कारागृहात चौकशी केली होती.

100 crore extortion : अजित पवार, अनिल परबांविरोधात गुन्हा दाखल करा! हायकोर्टात याचिका दाखल

ईडी अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात सचिन वाझेने अनिल देशमुखांचा उल्लेख नंबर १ असा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सचिन वाझेच्या जामिन अर्जावर कोर्ट काय सुनावणी करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

वसुलीचे पैसे स्विकारणारा No.1 कोण? ED चौकशीत Sachin Vaze ने महत्वाची दिली महत्वाची माहिती

    follow whatsapp