दिल्लीच्या अक्षरधाम मेट्रो स्टेशनवरून उडी मारणाऱ्या तरूणीचा उपचारा दरम्यान मृत्यू

मुंबई तक

• 02:32 AM • 15 Apr 2022

दिल्लीतल्या अक्षरधाम मेट्रो स्टेशनच्या छतावरून उडी मारणाऱ्या तरूणीचा मृत्यू झाला आहे. या मुलीने जेव्हा मेट्रो स्टेशनच्या छतावरून उडी मारली तेव्हा तिथे उभे असलेल्या काही जवानांनी तिला चादर घेऊन वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला या घटनेत गंभीर जखमा झाल्या होत्या. यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. रूग्णालयात उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रेमापायी संपवलं लाखमोलाचं आयुष्य; […]

Mumbaitak
follow google news

दिल्लीतल्या अक्षरधाम मेट्रो स्टेशनच्या छतावरून उडी मारणाऱ्या तरूणीचा मृत्यू झाला आहे. या मुलीने जेव्हा मेट्रो स्टेशनच्या छतावरून उडी मारली तेव्हा तिथे उभे असलेल्या काही जवानांनी तिला चादर घेऊन वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला या घटनेत गंभीर जखमा झाल्या होत्या. यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. रूग्णालयात उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

प्रेमापायी संपवलं लाखमोलाचं आयुष्य; 25 वर्षीय इंजिनिअर तरुणाची आत्महत्या

१४ एप्रिलच्या सकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी एक मुलगी दिल्लीतल्या अक्षरधाम मेट्रो स्टेशनच्या छतावर चढली आहे हे अनेकांनी पाहिलं. तिला त्या ठिकाणी पाहून CISF चे जवानही चकीत झाले. ते सगळेजण तिला उडी मारू नकोस असं आवाहन करत होते. मात्र या मुलीने कुणाचंही ऐकलं नाही. तिने उडी मारली. ती उडी मारण्याच्या आधी काही जवान चादर घेऊन आले होते. ते या प्रयत्नात होते की तिला चादरीत झेलता येईल. मात्र तसं काहीही घडलं नाही. त्या मुलीने उडी मारली आणि तिला गंभीर जखमा झाल्या. तिला तातडीने लाल बहादुर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

खळबळजनक घटना : तपोवन एक्स्प्रेसच्या खिडकीला गळफास घेऊन एकाची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी दिव्यांग होती. तिला बोलता येत नव्हतं आणि ऐकूही येत नव्हतं. या मुलीने नेमक्या कोणत्या कारणाने मेट्रो स्टेशनच्या छतावरून उडी मारली ? तिच्यापुढे असा नेमका काय प्रश्न होता की तिने टोकाचं पाऊल उचललं हे स्पष्ट झालेलं नाही. ही घटना घडत असताना ज्यांनी पाहिलं ते सगळेच जण CISF च्या जवानांचं कौतुक करत होते. कारण या मुलीला वाचवण्यासाठी या सगळ्यांनी खरोखरच तातडीने प्रयत्न केले. मात्र या मुलीचा रात्री उशिरा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

छत्तीसगढच्या दोन बहिणींची अकोल्यात धावत्या रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या

या मुलीने जेव्हा उडी मारली तेव्हा तिच्या पायाला गंभीर जखमा झाल्या. तसंच शरीराच्या इतर भागांमध्येही गंभीर जखमा झाल्या आणि रक्तस्त्रावही झाला. तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा ती उपचारांना प्रतिसाद देते आहे असं सांगण्यात आलं. मात्र रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. रूग्णालयाने या घटनेबाबत कोणतंही विस्तृत स्टेटमेंट दिलेलं नाही.

मृत तरूणी पंजाबमधली होती असं समजतं आहे. तिचं वय साधारण २० ते २२ वर्षे असावं असाही अंदाज व्यक्त केला जातो आहे. तिने हे टोकाचं पाऊल नेमकं का उचललं हे मात्र कळू शकलेलं नाही.

    follow whatsapp